गेट टुगेदर पार्ट्यांवर एक्साईजचा वॉच
By Admin | Updated: February 6, 2017 16:18 IST2017-02-06T16:18:35+5:302017-02-06T16:18:35+5:30
निवडणुकीतील आचारसंहिता : मद्य विक्री, वाहतूक रोखण्यासाठी पथके तैनात

गेट टुगेदर पार्ट्यांवर एक्साईजचा वॉच
गेट टुगेदर पार्ट्यांवर एक्साईजचा ह्यवॉचह्ण
निवडणुकीतील आचारसंहिता : मद्य विक्री, वाहतूक रोखण्यासाठी पथके तैनात
रेवणसिद्ध जवळेकर : सोलापूर
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट झाला असून, मतदान होईपर्यंत हॉटेल्स आणि अन्य ठिकाणी होणाऱ्या गेट टुगेदर पार्ट्यांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ह्यवॉचह्ण राहणार आहे. निवडणुकीतील आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी ह्यएक्साईजह्णने आराखडा तयार केला असून, बेकायदेशीर मद्य विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी विशेष यंत्रणा असल्याचे अधीक्षक सागर धोमकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.
कर्नाटक आणि गोव्यातून बनावट दारू सोलापूर जिल्ह्यात येऊ नये, यासाठी मंगळवेढा तालुक्यातील मरवडे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी आणि अक्कलकोट तालुक्यातील दुधनीत चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. शहरातील पुणे नाका, हैदराबाद नाका, अक्कलकोट नाका आणि विजापूर नाक्यावरही चेक पोस्ट राहणार आहे. चेक पोस्टच्या दिमतीला शहरात ४ तर ग्रामीण भागात ४ भरारी पथके सज्ज राहणार आहेत. अधीक्षक सागर धोमकर, उपअधीक्षक रविकिरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन निरीक्षक, १२ दुय्यम निरीक्षक, ६ सहायक दुय्यम निरीक्षक आणि ५० पुरुष, महिला कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
तीन प्रभागांसाठी एक कर्मचारी
महापालिकेच्या निवडणुकीसाठी २६ प्रभागातून विविध पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर ज्या प्रभागात पैसे अथवा दारु वाटपाच्या कोणी तक्रारी केल्या तर त्यांना तेथे तातडीने पोहोचता यावे, यासाठी एका प्रभागासाठी एका कर्मचाऱ्याची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी ९ कर्मचारी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास धोमकर यांनी व्यक्त केला.
बीअर बारची होणार तपासणी
मतदारांना विविध आमिष दाखविण्याचे प्रकार होत असतात. विशेष म्हणजे पैसा आणि मद्य या दोन गोष्टींना ज्या-त्या पक्षाचे उमेदवार प्राधान्य देत असतात. शहर आणि जिल्ह्यातील परमिट रूम आणि बीअर बारमध्ये १० पेक्षा एकत्र पार्ट्यांचे आयोजन होत असतील तर अशा पार्ट्यांवर करडी नजर एक्साईज विभाग ठेवणार आहे. शहर, जिल्ह्यातील हॉटेल्ससह राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील ढाब्यांची तपासणी करण्याचे आदेशही सागर धोमकर यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
आचारसंहिता कालावधीत ९७ अटकेत
१२ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०१७ या आचारसंहिता कालावधीत १२३ गुन्हे नोंदवून ९७ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील ३५०१ लिटर हातभट्टी दारु, ११६.६४ लिटर देशी दारु, ४२.३ लिटर बीअर, ३१.४६ लिटर विदेशी दारु जप्त करण्यात आली. एकूण ३२ लाख ९५ हजार २६९ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. आरोपींकडून १ कार, १ रिक्षा आणि दोन मोटरसायकलीही जप्त करण्यात आल्या.
कोट
शहर आणि जिल्ह्यात कुठे मतदारांना दारु देण्याचे काम होत असेल तर जागरुक मतदारांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा. त्यानंतर तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे.
-सागर धोमकर
अधीक्षक- राज्य उत्पादन शुल्क विभाग