विवाहितेवर अतिप्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST2021-06-18T04:16:27+5:302021-06-18T04:16:27+5:30

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातील विवाहितेशी लगट करण्याचा प्रयत्न केल्यावरून पांडुरंग बंडोपंत सुरवसे याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा ...

Excess on marriage | विवाहितेवर अतिप्रसंग

विवाहितेवर अतिप्रसंग

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातील विवाहितेशी लगट करण्याचा प्रयत्न केल्यावरून पांडुरंग बंडोपंत सुरवसे याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदला आहे.

पोलीस सूत्रानुसार, दोन वर्षांपूर्वी सदर इसमाने पीडित महिलेवर अत्याचार केला होता. त्यानंतर मनस्ताप झाल्याने महिलेने विष प्राशन केले. उपचारानंतर ती घरी आली तरीही त्याने तिचा पिच्छा सोडला नाही. शेतावर मजुरीसाठी जाताना तो पीडित महिलेचा पाठलाग करून अश्लील वर्तन करायचा. याबाबत महिलेने तिच्या पतीला ही हकीकत सांगितली. उभयतांनी सोलापुरातील पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले व घडल्या प्रकाराची माहिती सांगितली.

पोलीस उपअधीक्षक प्रभाकर शिंदे यांच्या आदेशाने संशयित पांडुरंग बंडोपंत सुरवसे याच्यावर विवाहितेवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर ॲट्रॉसिटी कायद्याचा भंग केल्याचाही गुन्हा आरोपीवर दाखल करण्यात आला आहे. मंद्रूप पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन शेटे याप्रकरणी तपास करीत आहेत.

Web Title: Excess on marriage