माजी पोलीस पाटलाची आत्महत्या
By Admin | Updated: May 31, 2014 00:48 IST2014-05-31T00:48:29+5:302014-05-31T00:48:29+5:30
करमाळा : दारूच्या नशेत माजी पोलीस पाटलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़

माजी पोलीस पाटलाची आत्महत्या
करमाळा : दारूच्या नशेत माजी पोलीस पाटलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना मीरगव्हाण (ता़ करमाळा) येथे बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली़ शहाजी गुंडिबा पाटील (वय ६५) असे त्यांचे नाव आहे़ शहाजी पाटील यांना दारूचे व्यसन होते़ बुधवारी मुलगा अविन पाटील दुधाचा पगार आणण्यासाठी करमाळा येथे आले होते तर सून मनीषा पाटील या शेतात गवत आणण्यासाठी गेल्या होत्या़ दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणावरून शहाजी पाटील यांनी घरातील छताच्या कडीला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ याची माहिती अविन पाटील यांनी करमाळा पोलीस ठाण्यात दिली़ या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास हवालदार संजय बगाडे व विजय थिटे करीत आहेत़