सोलापूरच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे : शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:19 IST2021-07-17T04:19:01+5:302021-07-17T04:19:01+5:30

सोलापूर : सोलापूरच्या विकासात पत्रकारांचे योगदान मोठे आहे. आता विकासासाठी सर्व नेत्यांनीही राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे, ...

Everyone should come together for the development of Solapur: Shinde | सोलापूरच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे : शिंदे

सोलापूरच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे : शिंदे

सोलापूर : सोलापूरच्या विकासात पत्रकारांचे योगदान मोठे आहे. आता विकासासाठी सर्व नेत्यांनीही राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

'लोकमत'चे दोन माजी संपादक सुधीर महाजन व राजा माने यांचा गौरव सोहळा सोलापुरात झाला. यावेळी आमदार सुभाष देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शिंदे आणि देशमुख यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन महाजन व माने यांचा गौरव करण्यात आला.

शिंदे भाषणात पुढे म्हणाले, सोलापूरची तरुण पिढी आता जगभर पोहोचली. पण तरीही सोलापूर शहराबाबत नकारात्मकता मांडली जाते.

यावेळी देशमुख म्हणाले की, शिंदे सोलापूरचे ज्येष्ठ नेते आहेत. सोलापूरच्या विकासासाठी काय करायला हवे, याबाबत त्यांनीच पुढाकार घ्यावा. आम्ही सर्वजण त्यासाठी प्रयत्न करू.

कार्यक्रमाचे स्वागत शिवाजी सुरवसे यांनी, तर प्रास्ताविक दत्ता थोरे यांनी केले. शेवटी चन्नवीर भद्रेश्वरमठ यांनी आभार मानले.

---

‘लोकमत’ हे लाेकांचे मत

‘लोकमत’ हे वृत्तपत्र लोकांचे मत मांडत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी केला. समाजाभिमुख पत्रकारितेचे प्रतिबिंब या दैनिकात उमटत असल्यानेच लोकमान्यता मोठी आहे. या दैनिकातून अनेक दर्जेदार पत्रकार घडविले गेले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Everyone should come together for the development of Solapur: Shinde