शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सोलापूरातील घटना ; टॉवरमध्ये अडकून ३० पक्षी मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 2:40 PM

पक्षीमित्रांचे धाडस : मराठी पत्रकार भवन चौकातील टॉवर खोलले

ठळक मुद्देमोबाईल टॉवर आणि रेडियसच्या प्रश्नाने स्वरुप गंभीरटॉवर हे पक्ष्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत टॉवरच्या  बेसमेंटमध्ये  अडकून चक्क ३० साळुंखी पक्ष्यांचा  मृत्यू

सोलापूर : वाढत्या ध्वनिप्रदूषणापाठोपाठ मोबाईल टॉवर आणि रेडियसच्या प्रश्नाने स्वरुप गंभीर केले आहे़ मोबाईल ही आजची नितांत गरज बनली असली तर यासाठी लावण्यात आलेले टॉवर हे पक्ष्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत याचीच प्रचिती गुरुवारी मराठी पत्रकार भवन चौकातील रिलायन्स टॉवरमध्ये आली. या टॉवरच्या  बेसमेंटमध्ये  अडकून चक्क ३० साळुंखी पक्ष्यांचा  मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे़ 

हा प्रकार सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वन्यजीवप्रेमी सदस्य शिवानंद आलुरे आणि मुकुंद शेटे या दोघांनी समोर आणला आहे़ या टॉवरमध्ये काही पक्षी अडकल्याचे आलुरे आणि शेटे यांना कळाले होते़ त्यांनी या टॉवरजवळ जाऊन पाहणी केली, परंतु अंधार असल्याने त्यांना काही करता आले नाही़

त्यानंतर दुसºया दिवशी त्यांनी रिलायन्स कंपनी आणि वनविभागाशी संपर्क साधून टॉवरचा दरवाजा खोलण्याची विनंती केली़ मात्र चौकशीत त्यांना हे टॉवर महापालिकेने सील केल्याचे निदर्शनास आले़ मनपाचे संबंधित अधिकारी भारत शिंदे यांच्याशी संपर्क साधला़ त्यांनी टॉवरचा दरवाजा खोलण्याची परवानगी मिळवली आणि त्यांनी रिलायन्स कंपनीच्या दोन टेक्निशयन आणि त्या दोन प्राणिमित्रांना समोर घेऊन अखेर टॉवर खोलले़ आत डोकावले असता टॉवर वरुन खुले दिसले़ या खुल्या टॉवरमधून बिळात पक्षी घरटी करायला गेले आणि ते पुन्हा वर आलेच नाहीत़ याही स्थितीत एक साळुंखी जिवंत अवस्थेत वर येण्यासाठी धडपडताना निदर्शनास आली़ तिचा जीव वाचला मात्र टॉवर ६० फूट उंचीवर असल्याने ३० साळुंखी पक्ष्यांना वर उडता आले नाही आणि ते मृतावस्थेत आढळून आले़

वनविभागाने रिलायन्सच्या अधिकाºयांना बोलावलेच्हा गंभीर प्रकार पाहता वनविभागाचे अधिकारी निकेतन जाधव यांनी रिलायन्सच्या अधिकाºयांना शुक्रवारी कार्यालयात बोलावले आहे़ या प्रकाराची माहिती त्यांनी त्यांच्याकडे मागितली आहे़ यानंतर काय कारवाई होणार याकडे प्राणिमित्रांचे लक्ष लागून आहे़ 

टॉवरवर टोपी बसवायची परवानगी मागितलीच्सोलापूर शहरात रिलायन्सने अनेक टॉवर उभारले आहेत़ या टॉवरच्या वादविवादात महापालिकेने पत्रकार भवन चौकातील हे टॉवर सील केले आहे़ नेमके या टॉवरवर टोपी घातलेली नव्हती़ ती घालण्यासाठी गुरुवारी रिलायन्सच्या अधिकाºयांनी नगरअभियंता संदीप कारंजे यांच्याकडे परवानगी मागितली आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका