शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

इथेनॉल सुरू होण्यासाठी ७० वर्षे का लागली; पाशाभाई पटेल यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 10:58 IST

पामतेल आयात करून आपल्या देशातील तेलघाणे काँग्रेसच्या सरकारने गायब केले : पाशाभाई पटेल

ठळक मुद्देअनेक वर्षे मागणी असलेला मार्डीतून जाणारा सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग याच सरकारने मंजूर केला - रणजितसिंह मोहिते-पाटील कृष्णा-भीमा स्थिरीकरण झाले तरच शिरापूर उपसा सिंचनचे पाणी तुम्हाला मिळणार आहे - रणजितसिंह मोहिते-पाटील

सोलापूर: ब्राझीलमध्ये इथेनॉल सुरू झाल्यानंतर भारतात इथेनॉल सुरू होण्यासाठी ७० वर्षे का लागली?, पामतेल आयात करून आपल्या देशातील तेलघाणे काँग्रेसच्या सरकारने गायब केले, असा घणाघाती आरोप कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशाभाई पटेल यांनी मार्डी येथे बोलताना केला. 

भाजप-सेना युतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या प्रचारासाठी  मार्डीत झालेल्या सभेत ते बोलत होते. जगात इंधन आयात करणाºया देशात सर्वाधिक इंधन आयात करणारा देश भारत असल्याचे सांगत पटेल यांनी आकडेवारीच सादर केली. ब्राझीलमध्ये १९३१ मध्ये इथेनॉल तयार होऊ लागले, ते भारतात २००१ मध्ये सुरू झाले. शेतकºयांचा कळवळा असलेल्या काँग्रेसने इथेनॉल तयार करण्यासाठी ७० वर्षे का लावली? असा सवाल पटेल यांनी विचारला. 

शरद सूत गिरणी कोण बंद पाडली?, उत्तर सोलापूर तालुका खरेदी-विक्री संघाची मालमत्ता कोण विकली?, जिल्हा बँकेचे कर्ज सोसायटीतून कोणाच्या बगलबच्च्यांना मिळते?, शिरापूरचे पाणी १५ वर्षे तालुक्याला का मिळाले नाही?, बाजार समितीच्या बैठकीत ५६ विषय अडीच मिनिटात मंजूर कसे होतात?, याची उत्तरे तालुक्यातील काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांना विचारा, असे आवाहन उपस्थितांना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, अनुसूचित जाती समितीचे अध्यक्ष सुभाष पारवे, भारत जाधव यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख शहाजी भोसले, सुधीर गोरे, सभापती संध्याराणी पवार, इंद्रजित पवार, शिवाजी सोनार, राजू हौशेट्टी, राजू सुपाते, श्रीमंत बंडगर, काशिनाथ कदम आदी उपस्थित होते.

कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा आम्हाला विश्वास- रणजितसिंह अनेक वर्षे मागणी असलेला मार्डीतून जाणारा सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग याच सरकारने मंजूर केला, पूर्वी केंद्राने एक रुपया पाठविला तर गावात १५ पैसे येत होते, आता संपूर्ण रुपया गावात येतो, असे सांगत कृष्णा-भीमा स्थिरीकरण झाले तरच शिरापूर उपसा सिंचनचे पाणी तुम्हाला मिळणार आहे, हे काम करण्याचा आम्हाला विश्वास असल्याचे माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरPasha Patelपाशा पटेलBJPभाजपाcongressकाँग्रेस