करमाळ्यात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:48 IST2021-02-05T06:48:07+5:302021-02-05T06:48:07+5:30

यासाठी करमाळा शहरातील २० जणांची पुतळा उपसमिती गठित केली आहे. यामध्ये प्रवीण जाधव अध्यक्ष, शौकत नालबंद सचिव, डॉ. अविनाश ...

Equestrian statue of Chhatrapati Shivaji to be erected in Karmala! | करमाळ्यात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणार!

करमाळ्यात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणार!

यासाठी करमाळा शहरातील २० जणांची पुतळा उपसमिती गठित केली आहे. यामध्ये प्रवीण जाधव अध्यक्ष, शौकत नालबंद सचिव, डॉ. अविनाश घोलप खजिनदार, वैभव जगताप, अहमद कुरेशी, राणी आव्हाड, भाग्यश्री किरवे, स्वाती फंड, अतुल फंड, शारदा राखुंडे, संजय सावंत, अल्ताफ तांबोळी, संगीता खाटेर, श्रीनिवास कांबळे, वंदना ढाळे, सीमा कुंभार, प्रमिला कांबळे, राजश्री माने, कन्हैयालाल देवी व सचिन घोलप सदस्य आहेत.

या कामासाठी ७० लक्ष रुपये खर्च अपेक्षित असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी लोकवर्गणीतून ३० लक्ष रुपये जमा केले जाणार आहेत.

करमाळा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी सर्वच शिवप्रेमी एकदिलाने व एकमुखाने कार्य करत आहेत.

कोट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी सर्वच स्तरातून लोकसहभाग लाभणार आहे. लवकरात लवकर हे कार्य पूर्णत्वास येईल याची खात्री वाटते.

- वैभवराजे जगताप, अध्यक्ष, करमाळा नगर परिषद.

---

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाकरिता आवश्यक निधीची मागणी पालकमंत्री संजयमामा शिंदे यांच्याकडे करणार आहोत.

- प्रवीण जाधव, अध्यक्ष, करमाळा शहर पुतळा उपसमिती.

----

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी प्रशासन सर्व शासकीय निर्णय व कायदेशीर बाबींची पूर्तता करून, लवकरात लवकर हे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

-वीणा पवार, मुख्याधिकारी, करमाळा नगर परिषद.

----

फोटो ओळी : करमाळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा परिसराचे सुशोभीकरण व चबुतरा उभारणीच्या प्रकल्प अहवाल तयार करण्याचे पत्र देताना नगराध्यक्ष वैभवराजे जगताप व पुतळा उपसमितीचे सदस्य.

Web Title: Equestrian statue of Chhatrapati Shivaji to be erected in Karmala!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.