उद्योजक पुत्राच्या लग्नाला बंधनं आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:21 IST2021-04-25T04:21:57+5:302021-04-25T04:21:57+5:30

सापटणे येथे उद्योजक विठ्ठल ढवळे यांचा मुलगा स्वप्नील ढवळे यांचे २९ एप्रिल रोजी विवाह सोहळा नियोजित होता. मात्र, संचारबंदीमुळे ...

Entrepreneur's son's marriage was bound | उद्योजक पुत्राच्या लग्नाला बंधनं आली

उद्योजक पुत्राच्या लग्नाला बंधनं आली

सापटणे येथे उद्योजक विठ्ठल ढवळे यांचा मुलगा स्वप्नील ढवळे यांचे २९ एप्रिल रोजी विवाह सोहळा नियोजित होता. मात्र, संचारबंदीमुळे अवघ्या २५ लोकांच्या उपस्थितीतच हा विवाह करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खरेदी केलेल्या दोन हजार साड्या महिलांना व धान्याचे किट गरजूंना वाटप केले, तसेच टेंभुर्णी व कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी, पिंपळनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचाही त्यांनी सन्मान केला.

यावेळी माजी उपसभापती बंडूनाना ढवळे, भीमराव ढवळे, सरपंच नागनाथ कुबेर, उपसरपंच गणेश ढवळे, अमोल ढवळे, प्रमोद ढवळे, नारायण गायकवाड, संतोष जगताप, बापू कुराडे, तानाजी ढवळे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

फोटो

२४टेंभुर्णी०१

ओळी

सापटणे (टें) येथील गरजू महिलांना साड्या व धान्याचे किट वाटप करताना उद्योजक विठ्ठल ढवळे, बंडूनाना ढवळे व अन्य.

Web Title: Entrepreneur's son's marriage was bound