शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात तिरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 14:57 IST

सोलापूर राखीव मतदारसंघात यावेळी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात अत्यंत चुरशीचा असा तिरंगी सामना होत आहे.

सोलापूर राखीव मतदारसंघात यावेळी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात अत्यंत चुरशीचा असा तिरंगी सामना होत आहे.>मोदी माहात्म्याचे पारायणजयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य, सर्जिकल स्ट्राइक, रस्त्यांचा विकास, भविष्यातील सिंचन योजना, शेतकरी व मजुरांना पेन्शन यावर जोर देण्यात आला. त्याचबरोबर, स्थानिक विमानतळ, रेल्वेचे जाळे या प्रश्नांवर प्रचारात भर दिला. भाजपची सारी भिस्त मतविभागणीवर अवलंबून असल्याने सोशल इंजिनीअरिंग करण्याचा प्रयत्न केला.

राफेल घोटाळा आणि ‘न्याय’सुशीलकुमार शिंदे हे ज्येष्ठ अनुभवी नेते असल्याने त्यांनी राष्टÑीय प्रश्नांवर प्रचारात दिला. नोटाबंदी, जीएसटीमुळे झालेली देशाची आर्थिक हानी, बेरोजगारी आणि राफेल विमान घोटाळा, यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला, तसेच काँग्रेसने जाहीर केलेली गरिबांसाठीची न्याय योजना समजावून सांगितली.
>संविधान बचाव अन् सामाजिक ऐक्यअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे या लढतीत खऱ्या अर्थाने चुरस आली. आंबेडकरांनी रा.स्व. संघ आणि भाजपच्या संकुचित धोरणांमुळे संविधान कसे धोक्यात आले आहे, यावर भर दिला, तसेच ही लढाई राजकीय नसून सामाजिक ऐक्यासाठीचा लढा असल्याचे वारंवार सांगितले. वेगळ्या मुद्द्यांमुळे त्यांच्या सभांना गर्दी दिसून आली.>हेही उमेदवार रिंगणातलोकसभा निवडणुकीत 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. वरील तीन प्रमुख उमेदवारांबरोबरच अर्जुन ओहळ, कृष्णा भिसे, विष्णू गायधनकर, व्यंकटेश स्वामी, अशोक उघडे, सुदर्शन खंदारे, अ‍ॅड. मनीषा कारंडे, मल्हारी पाटोळे, अ‍ॅड. विक्रम कसबे, श्रीमंत मस्के या उमेदवारांचा समावेश आहे. यातील सहा उमेदवार अपक्ष आहेत. सन २0१४ मध्ये १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यात ११ अपक्ष उमेदवार होते, तसेच सन २00९ मध्ये १३ जण निवडणूक रिंगणात होते त्यात अपक्ष ७ होते.

टॅग्स :solapur-pcसोलापूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेLok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्स