शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतात राबताना ‘त्या शेतकऱ्याने’ लिहिली शेतकऱ्यांचं दु:ख मांडणारी इंग्रजी कादंबरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 05:34 IST

सोलापूरच्या पांडुरंगची किमया : ‘किंग्डम इन ड्रीम’ आंतरराष्ट्रीय पटलावर

प्रसाद पाटीलसोलापूर : अक्षरशत्रू आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या वस्तीवरच्या मुलाने शेतीत राबता -राबता चक्क इंग्रजीतून कादंबरी लिहिण्याची किमया साधली आहे. शेतकऱ्यांच्या दु:खांचे प्रतिबिंब त्याच्या ‘किंग्डम इन ड्रीम... दी प्राइम मिनिस्टर’ या कादंबरीतून उमटले आहे.

पांडुरंग तानाजी मोरे हा पानगावचा (ता. बार्शी ) राहणारा एक जिद्दी तरुण. त्याची ही कादंबरी पॅट्रीएज इंडिया या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे. छापील व ई-बुक स्वरुपातील ही कादंबरी आॅनलाइनही उपलब्ध आहे. आपली पहिली-वहिली कादंबरी पांडुरंगने माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना समर्पित केली आहे. अठरा विशे दारिद्र्यात वाढलेल्या पांडुरंग याने बी.एड. पूर्ण केले. सहायक प्राध्यापक म्हणून नोकरीही मिळाली. पण लिखाणाला वेळ मिळेना म्हणून नोकरी सोडून दिली आणि पत्र्याच्या शेडमध्ये गावातच शेतातील कामे करत करत लिखाण सुरू केले.पहिली कादंबरी प्रकाशित करण्यासाठी पांडुरंगला खूप परिश्रम घ्यावे लागले. मात्र आजही तो शेतात राबतो. आपली नाळ मातीशी जोडलेली राखत त्याचे लिखाण सुरुच आहे. सध्या त्याची इंग्रजीतून ‘व्हाइटमनी’ ही कादंबरी, तसेच ‘दि बर्थ डे गिफ्ट’, ‘हजबंड टेक्स्ट हजबंड ’ व ‘द डार्क अवे’ ही इंग्रजी नाटके, तर ‘लिडरशिप आॅफ सॉ’ व ‘आय आस्क फ्रिडम’ हे कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.जिद्दीनेच मिळाले बळशेतातील कुळवणी, पेरणी, खुरपणी, आंतरमशागत, कापणी, काढणी, मळणी याबरोबरच जनावरांचा व्याप हाताळत पांडुरंग लिहीत राहिला. पण शेतमजूर म्हणून कामं करुन फाटक्या प्रपंचाला ठिगळं लावायचा प्रयत्न करणाºया आई-वडिलांच्या दृष्टीने, ‘नोकरी सोडून दिली... अन् कागदं काळी करत बसतोय नुस्ती’ असे बोल त्याला ऐकावे लागले. जिद्दीने त्याला लिखाणाची प्रेरणा मिळत गेली आणि ‘किंगडम इन ड्रीम’ पूर्ण झाली.

टॅग्स :FarmerशेतकरीSolapurसोलापूर