शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अभियंता दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:25 IST2021-09-22T04:25:52+5:302021-09-22T04:25:52+5:30
एम. आर. गायकवाड यांच्या हस्ते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. एम. आर. ...

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अभियंता दिन साजरा
एम. आर. गायकवाड यांच्या हस्ते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. एम. आर. गायकवाड म्हणाले, सर विश्वेश्वरय्या यांनी आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाच्या व कौशल्याच्या आधारे जगामध्ये आदर्श ठरतील, अशी स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेली धरणे, वृंदावने भारतात उभी केली. आजच्या अभियंत्यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा आदर्श घेऊन वाटचाल करावी, असेही आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी उपप्राचार्य विक्रांत गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ. रणजित देशमुख हस्ते त्यांचा सत्कार केला. यावेळी संस्थाध्यक्ष बी. आर. गायकवाड, सचिव ए. आर. गायकवाड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एस. एम. सावंत यांनी केले, तर आभार प्रा. पी. सी. चव्हाण यांनी मानले.