शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

सोलापूर जिल्ह्यातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची ‘बाटू’ला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:37 IST

सोलापूर विद्यापीठ : १५ पैकी ८ महाविद्यालयांचे संलग्नीकरण; २ हजार २४० जागांचे वाटप

ठळक मुद्देबाटूशी संलग्नित ८ महाविद्यालयात अंतिम फेरीत १ हजार १६५ जागा वाटपसोलापूर जिल्ह्यात विद्यार्थी बाटूला पसंती देत आहेतराज्यस्तरीय विद्यापीठाची पदवी मिळते म्हणून बाटूला पसंती दर्शविली

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील १५ पैकी यंदा ८ अभियांत्रिकी महाविद्यालयांचे संलग्नीकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी (बाटू) झाले आहे. यंदाच्या वर्षी थेट द्वितीय वर्ष पदवी प्रवेशाच्या तिसºया फेरीत विद्यार्थ्यांनी बाटूला सर्वाधिक पसंती दर्शविली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील १५ अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी ४ हजार १६२ जागा रिक्त होत्या. २ हजार २४0 जागा (५३.८२ टक्के) अंतिम फेरी अखेर वाटप झाल्या आहेत. बाटूशी संलग्नित ८ महाविद्यालयात अंतिम फेरीत १ हजार १६५ जागा वाटप झाल्या आहेत. सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या ८ महाविद्यालयात १ हजार ७५ जागा वाटप झाल्या आहेत.

बाटूने अभियांत्रिकी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना मेडिकलप्रमाणे शेवटच्या वर्षातील सेमिस्टर मध्ये पॅ्रक्टीकलवर भर दिला आहे. शेवटच्या ८ व्या सेमिस्टरमध्ये कंपनीमध्ये जाऊन प्रत्यक्ष काम करण्याचे शिक्षण घ्यावे लागते. एखादा विद्यार्थी परीक्षेत जर अनुत्तीर्ण झाला असेल तर अवघ्या १५ दिवसात पुनर्परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा आॅब्जेक्टीव्ह स्वरुपाची असून ती आॅनलाईन घेतली जाते. परीक्षेचा निकाल तत्काळ लागून विद्यार्थ्यांचे नुकसान होत नाही. 

बाटूची डिग्री ही राज्यस्तरावरची असल्याने याला वेगळे महत्त्व प्राप्त होते. या कारणास्तव सोलापूर जिल्ह्यात विद्यार्थी बाटूला पसंती देत आहेत. यंदाच्या वर्षी कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय, शेळवे, पंढरपूरने बाटूशी संलग्नीकरण केले असून प्रथम वर्षाचा प्रवेश देण्यात आला आहे. 

बाटूशी संलग्नित महाविद्यालये

  • - एन.के. आॅर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर. 
  • - व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकी महाविद्यालय, सोरेगाव. 
  • - ए.जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर. 
  • - फॅबटेक इनिस्टट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, सांगोला. 
  • - भगवंत इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, बार्शी. 
  • - श्रीराम इन्स्टिट्यूट, पानीव, ता. माळशिरस. 
  • - भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव. 

सोलापूर विद्यापीठात बी.ई. ची पदवी मिळते. बाटूमध्ये बी.टेक. ही पदवी मिळते. शिवाय बाटूमध्ये प्रॅक्टिकल शिक्षण जास्त प्रमाणात असून भवितव्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. शिवाय राज्यस्तरीय विद्यापीठाची पदवी मिळते म्हणून बाटूला पसंती दर्शविली. -देवाशिश नागणसुरे, विद्यार्थी, आॅर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय

प्लेसमेंटसाठी बहुतांश कंपन्या या जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महाविद्यालयात येत असतात. एखादा विद्यार्थी जर अनुत्तीर्ण झाला तर त्याला तत्काळ १५ दिवसात परीक्षा देता येते आणि अशा कंपन्यांमध्ये नोकरी मिळवता येते. जे.बी. दफेदार, प्राचार्य, आॅर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरcollegeमहाविद्यालय