सोलापूरात मनपा निवडणुकीत ‘इंजिन’ धावणार

By Admin | Updated: January 24, 2017 19:33 IST2017-01-24T19:33:20+5:302017-01-24T19:33:20+5:30

सोलापूरात मनपा निवडणुकीत ‘इंजिन’ धावणार

'Engine' will run in municipal elections in Solapur | सोलापूरात मनपा निवडणुकीत ‘इंजिन’ धावणार

सोलापूरात मनपा निवडणुकीत ‘इंजिन’ धावणार

सोलापूरात मनपा निवडणुकीत ‘इंजिन’ धावणार
काशिनाथ वाघमारे - सोलापूर
महानगरपालिकेच्या निवडणुकीत इतर पक्षांच्या स्पर्धेत आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी मनसेच्या इंजिनने धावण्याची तयारी चालवली आहे़ सर्वच प्रभाग लढवण्याची तयारी ठेवली असून, या पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत ९७ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या़ तसेच सोलापूरचे संपर्कप्रमुख म्हणून बाबाराजे जाधवराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे़
यापूर्वीही मनसेने महापालिकेच्या जागा लढविल्या आहेत़ परंतु गटतट आणि तुल्यबळाच्या अभावामुळे महापालिकेत खाते खोलू शकले नव्हते़ खाते खोलण्याची आता पुन्हा संधी आल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे़ तीन महिन्यांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात अर्थात शिवाजी चौकात कार्यालय खोलण्यात आले आहे़ संघटन अभाव, आहे त्या पदाधिकाऱ्यांमध्ये गटातटाचे राजकारण, पक्षाच्या कार्यक्रमांचा अभाव, प्रदेश कार्यकारिणीतील संपर्क नेत्यांची सोलापूरकडे पाठ, अशा अनेक कारणांवरुन सोलापूरमध्ये पक्षाच्या अस्तित्वाला वावच मिळू शकले नाही़ चार महिन्यांपूर्वी पक्षाच्या श्रेष्ठींनी सोलापूरकडे लक्ष वेधले आणि चार-पाच वेळा बैठका घेऊन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकत्रित येऊन कामाला लागण्याबाबत कान टोचले़
नवे संपर्क अध्यक्ष बाबाराजे जाधवराव हे मंगळवारी सोलापुरात दाखल झाले़ पक्षाच्या कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती नोंदविण्यात आल्या़ जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, शहर अध्यक्ष युवराज चुंबळकर, प्रशांत इंगळे, शहर संघटक उमेश रसाळकर यांनी मुलाखती घेतल्या़ ढोल-ताशांच्या गजरात शक्तिप्रदर्शन करीत इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले़
-----------------------
९७ पैकी ६० इच्छुक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते
४मुलाखती दिलेल्या ९७ इच्छुकांपैकी ६० इच्छुक हे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत़ पक्षनिष्ठेचे फळ देण्याचा प्रयत्न पक्षाकडून होणार आहे़ रवी शिंदे (प्रभाग ११), श्रीधर गुडेली (प्रभाग ९), अनिल भिसे (प्रभाग २२), रुक्मिणी जाधव (प्रभाग २२), भारती मन्सावाले (प्रभाग १४), अर्चना इंगळे (प्रभाग २), कय्युम सिद्दीकी (प्रभाग १९), नितीन व्हसकेरी (प्रभाग २०), गोविंद बंदपट्टे (प्रभाग १३) पक्षासाठी धडपडणाऱ्या या प्रमुख उमेदवारांसह आज ९७ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या़

Web Title: 'Engine' will run in municipal elections in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.