मार्चअखेर सोलापूर होणार हागणदारी मुक्त

By Admin | Updated: March 3, 2017 18:49 IST2017-03-03T18:49:58+5:302017-03-03T18:49:58+5:30

मार्चअखेर सोलापूर शहर ९५ टक्के हागणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली.

At the end of March, Solapur will take the hammer free | मार्चअखेर सोलापूर होणार हागणदारी मुक्त

मार्चअखेर सोलापूर होणार हागणदारी मुक्त

 आॅनलाइन लोकमत

सोलापूर, दि. ३  - मार्चअखेर सोलापूर शहर ९५ टक्के हागणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली. 
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरात १५ हजार ६00 वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १२ हजार ३00 शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मार्चअखेर उर्वरित शौचालयांचे बांधकाम पूर्ण करून घेतले जाणार आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या ११ हजार ६00 शौचालयाचे छायाचित्र स्वच्छ भारत मिशनच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे. उर्वरित कामांची तपासणी करून कामे पूर्ण झालेल्या शौचालयाचे छायाचित्र अपलोड करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणीच्या कामावर सोलापूर आघाडीवर आहे. ज्या ठिकाणी जागा नाही पण नागरिकांची मागणी असेल तर कमी जागेत प्रिकास्ट शौचालय उभारणीस मंजुरी दिली आहे. अशा शौचालयास ड्रेनेजलाईनला थेट जोडणी देण्याचे सांगण्यात आले आहे. 
शहरात उघड्यावर शौचालय करण्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. यापूर्वी ११५ ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. उर्वरित १२0 ठिकाणी तातडीने सामूहिक शौचालय बांधण्यास आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात (६७/३ क) मंजुरी दिली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या सामूहिक शौचालय ठिकाणी पाण्याची सोय नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अशा ३५ ठिकाणी तातडीने बोअर घेऊन पाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. त्यामुळे १८ मार्चपर्यंत शहर ९५ टक्के हागणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

Web Title: At the end of March, Solapur will take the hammer free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.