शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

लॉकडाऊन संपवा मात्र जिल्हाबंदी कायम ठेवा..!

By appasaheb.patil | Updated: April 8, 2020 10:01 IST

सोशल मीडियावर सोलापूरकरांचे मत; दुकाने सुरू ठेवा अन् जमावबंदी कायम ठेवा...

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात संचारबंदी लागूसर्वसामान्यांचं जगणं झाले मुष्कीलअन्नधान्यासाठी गोरगरीब जनता रस्त्यावर

सोलापूर : देशातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केले आहे़ या लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद आहे़ या बंदमुळे सर्वसामान्यांचे हाल होतानाचे पहावयास मिळत आहे़ शिवाय गोरगरीब जनतेला दोन वेळचं जेवण मिळणे मुश्किल होऊन बसले आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता आणखीन काही दिवस लॉकडाउन वाढण्याची शक्यता सध्या सोशल मिडियावर होत असलेल्या व्हायरल मॅसेजमुळे वर्तविण्यात येत आहे़ खरंच लॉकडाऊनची मुदत वाढवावी की कमी करावी याबाबत सोलापूरकरांच्या मनात काय आहे याबद्दल लोकमत च्या टिमने काही लोकांशी संवाद साधला़ लॉकडाऊन हटवा...जिल्हाबंदी कायम ठेवा, नागरिकांनी गर्दी करण्याचे टाळावे, स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक असेल तर घराबाहेर पडा, विनाकारण एकाठिकाणी गर्दी करू नको, शासनाच्या नियमांचे पालन करा असा एक नाही अनेक प्रकारची प्रतिक्रिया सोलापूरकरांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.

लॉकडाउनमुळे माझ्या दुकानात अनेकांचे मोबाईल दुरूस्ती होऊन पडलेले आहेत़ ग्राहकांचे वारंवार फोन येत आहेत़ आमचा मोबाईल द्या, आम्हाला गरज आहे़़़पण लॉकडाऊनमुळे दुकान उघडता येईना त्यामुळे शेकडो ग्राहकांचे मोबाईल तसेच पडून आहेत़ शासनाने लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा, कडक उपाययोजनाव्दारे कोरोनामुक्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत़ विनाकारण घराबाहेर न पडता नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, कोरोनामुक्तीसाठी पुढाकार घ्यावा़- स्वप्नील जाधव,मोबाईल विक्रेता, सोलापूर

आमचा इस्त्रीचा व्यवसाय आहे़ आम्ही नवरा-बायको दोघेही इस्त्री मारण्याचे काम करतो़ मात्र लॉकडाऊनमुळे आमचा व्यवसाय मागील दहा ते बारा दिवसांपासून बंद आहे़ आमच्या घरात आर्थिक अडचण सुरू आहे़ ज्यांचे कपडे तयार आहेत तेही दुकान बंद असल्यामुळे देता येत नाहीत. होय सरकार आमच्या चांगल्यासाठीच निर्णय घेत आहे पण त्यातही थोडया प्रमाणात सुट द्यावी, लॉकडाऊन हटवावे, गोरगरीबांना जगण्यासाठी मदत करावी़- सागर राऊत, लॉड्री व्यावसायिक, सोलापूर

देशात लॉकडाऊन स्थितीमुळे कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात होत आहे़ इतर देशापेक्षा भारतात रूग्णांची संख्या कमी आहे़ शासनाने केलेल्या विविध उपाययोजनांचे खरेच कौतुक करायला हवे़ पण लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे जगणं मुश्किल होऊन बसले आहे़ लॉकडाऊन काढल्यास सर्वसामान्यांना काम मिळेल, पैसा मिळेल अन त्यांच्या गरजा पूर्ण करता येतील़ सर्वच काही बंद असल्यामुळे माणूस घरात बसून बसून वेडा होऊ लागला आहे़ लॉकडाऊन काढल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल़- सुशीला कुंभार,सर्वसामान्य नागरिक, सोलापूर

या लॉकडाऊन निर्णयामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे़ हाताला काम नाही, खायला अन्न नाही काय करायचं़ कोरोनाने मरण्यापेक्षा अन्नपाण्याविना लोक मरतील. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत़ नागरिकांनीही शासनाच्या प्रत्येक उपाययोजनांचा साथ द्यायला हवी मात्र शासनाने लॉकडाऊन उघडल्यास सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुंदर होईल़ त्वरीत लॉकडाऊन मागे घ्यावे, आणखीन काही दिवस वाढवू नये़- अर्चना जाधवनागरिक, सोलापूर

मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर १४ तारखेपर्यंत असणारे लॉकडाऊन जुनपर्यंत असणार आहे असे मॅसेज व्हायरल होत आहेत़ त्यामुळे काहीच कळतं नाही की ते लॉकडाऊन कधी संपणार आहे की वाढणाऱ शासनाने देशातील कोरोनाची संख्या जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवावे़ जेणेकरून संसर्ग होऊन रूग्णांची संख्या वाढणार नाही़ नागरिकांनी कोरोनापासून मुक्त होण्यासाठी घराबाहेर पडणं टाळावे, स्वच्छता राखावी, सोशल मिडियावर फिरणाºया संदेशावर विश्वास ठेऊ नका़- अमोल शहा,महाविद्यालयीन विद्यार्थी, सोलापूर

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस