शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील ‘स्वामी समर्थ’ साखर कारखान्यांवर अवसायकाची नियुक्ती, संचालकांचा खुलासा अमान्य, बंद कारखान्यावर कर्जाची रक्कम वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 13:05 IST

संचालक मंडळाच्या वतीने दिलेला खुलासा फेटाळत अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून अवसायक नेमण्याचा आदेश प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी कायम केला आहे. 

ठळक मुद्देस्वामी समर्थ कारखान्यावरील कर्जाची थकबाकी वाढल्याने व साखर कारखाना मागील तीन वर्षांपासून बंदमागील पाच वर्षे आलेली नैसर्गिक आपत्ती, शेतीतील झालेल्या उत्पन्नात घट व अन्य कारणामुळे कारखाना आर्थिक अडचणीत कारखान्याच्या वतीने दिलेला खुलासा व जिल्हा बँकेचे म्हणणे फेटाळत अक्कलकोटच्या स्वामी समर्थ कारखान्यावर अवसायक नेमण्याचा आदेश कायम केला

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २५ : संचालक मंडळाच्या वतीने दिलेला खुलासा फेटाळत अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून अवसायक नेमण्याचा आदेश प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी कायम केला आहे. स्वामी समर्थ कारखान्यावरील कर्जाची थकबाकी वाढल्याने व साखर कारखाना मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून अवसायक नेमण्याचा अंतरिम आदेश ६ आॅक्टोबर २०१७ रोजी काढला होता. प्रादेशिक सहसंचालक(साखर) यांनी ही कारवाई करीत अवसायकाची नेमणूक केली होती.  जिल्हा बँक व कारखान्याला म्हणणे सादर करण्याची संधी दिली होती. जिल्हा बँकेच्या वतीने सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी दिलेल्या खुलाशात कारखान्याने घेतलेले कर्ज वसूल करण्यासाठी अवसायक नेमल्यास अडचण येणार असून कर्ज बुडीत होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. मागील पाच वर्षे आलेली नैसर्गिक आपत्ती, शेतीतील झालेल्या उत्पन्नात घट व अन्य कारणामुळे कारखाना आर्थिक अडचणीत आला असल्याने अवसायक नेमणे अयोग्य असल्याचे जिल्हा बँकेच्या खुलाशात म्हटले आहे.साखर कारखान्याच्या वतीने माजी अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी संस्था मोडकळीस आणणे योग्य होणार नाही, अवसायक नेमल्याने शेतकरी ऊस उत्पादकांचे नुकसान होणार आहे असे म्हटले आहे. अवसायक न नेमता कारखाना सुरू करुन बँकांची देणी वरचेवर कमी करणे व एफ.आर.पी. ची रक्कम देणे सोयीचे होण्यासाठी अवसायक नेमू नये असे खुलाशात पाटील यांनी म्हटले होते. कारखान्याच्या वतीने दिलेला खुलासा व जिल्हा बँकेचे म्हणणे फेटाळत अक्कलकोटच्या स्वामी समर्थ कारखान्यावर अवसायक नेमण्याचा आदेश कायम केला आहे. कारखान्याचे अवसायक (परिसमापक) म्हणून महाराष्टÑ राज्य सहकारी बँक प्रमोद देशमुख यांची नियुक्ती कायम ठेवली आहे. ----------------------संतनाथ नंतर स्वामी समर्थच्वैरागच्या संतनाथ साखर कारखान्यावर यापूर्वीच अवसायक नेमला आहे. शंकर साखर कारखान्याचे प्रकरण न्यायालयात लटकले आहे. स्वामी समर्थ कारखान्यावर मात्र अवसायक नेमण्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालकांनी घेतला आहे. एकीकडे जिल्ह्यात ४० वा साखर कारखाना अक्कलकोट तालुक्यात उभारला जात असताना याच तालुक्यातील पहिला साखर कारखाना आर्थिक अडचणीत अडकला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने