शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
2
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
4
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
5
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
6
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
7
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
8
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
9
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
10
प्रज्वल रेवन्ना यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी, अश्लिल व्हिडिओ प्रकरणी जर्मनीहून परतल्यावर SIT ने केली होती अटक
11
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
12
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
13
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
14
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
15
कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं
16
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
17
भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार
18
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
19
मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!
20
"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आंदोलनात, कार्यालयात अधिकारी निवांत

By संताजी शिंदे | Published: March 14, 2023 7:31 PM

बेमुदत बंदमुळे लोकांनीही शासकीय कार्यालयात जाण्यच टाळलं

सोलापूर: जुन्या पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी वर्ग-२ ते वर्ग-४ मधील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता, त्यामुळे सर्व कार्यालयात शुकशुकाट होता. वरिष्ठ अधिकारी आपल्या खुर्चीवर बसून होते, सर्वांना सुट्टी असल्याचा अनुभव येत होता. दिवसभरात लोकांनीही जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात येण्याचे टाळले.

नेहमी प्रमाणे मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता सुरू झाले, मात्र पदोन्नतीने गेलेल्या वर्ग-२ मधील अधिकाऱ्यांसह चतुर्थश्रेणी प्रवर्गातील कर्मचारी आले नाहीत. सकाळच्या सत्रात काही लोक कामा निमित्त आले होते, मात्र तिथे फक्त अधिकारी उपस्थित होते. मुळ काम करणारे कर्मचारी व अधिकारी संपात गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आलेले नागरिकही आज आपले काम होणार नाही याची खात्री करून परत गेले. नेहमी वर्दळ आणि कामानिमित्त गर्दी असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात शुकशुकाट दिसत होता. कार्यालयातही अधिकारी सोडले तर सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या.

अपर जिल्हाधिकारी, गौण खनिज विभाग, पुरवठा विभाग, उपविभागीय अधिकारी क्र.१ व २, नरगभूमापन कार्यालय, ग्रामपंचायत निवडणूक कार्यालय, पुर्नवसन, जिल्हा निवडणूक अधिकारी, नगर विकास, गृह विभाग, संजय गांधी निराधार, दुय्यम निबंधक कार्यालय, दक्षिण तहसील कार्यालय, प्रशासकीय इमारतीमधील कृषी विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, मत्य विभाग, सिटी सर्व्हे, जिल्हा उपनिबंधक कार्यालय यासह जिल्हा कोषागार मध्येही शुकशुकाट होता. सर्वत्र नेहमी प्रमाणे गर्दी दिसून येत नव्हती.

शिपाई लिपिक कोणी नाही, फाईल काढून देणार कोण?कार्यालयात अधिकारी उपस्थित होते, मात्र त्यांना काम करण्यासाठी आवश्यक असलेली फाईल देणार कोण अशी स्थिती निर्माण झाली होती. रोजच्या कामाची माहिती असलेले कर्मचारीची आंदोलनात गेल्याने काही अधिकाऱ्यांची पुरती पंचायत झाली होती. काही अधिकाऱ्यांनी स्वत: जाऊन फाईली शोधण्याचा प्रयत्न केला तर काहींनी निवांत राहण्यात धन्यता मानली.

टॅग्स :SolapurसोलापूरEmployeeकर्मचारी