टेस्टींग, ट्रेसिंग, लसीकरणावर भर : बेल्हेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:19 IST2021-04-05T04:19:42+5:302021-04-05T04:19:42+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर तालुकास्तरीय समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, ...

टेस्टींग, ट्रेसिंग, लसीकरणावर भर : बेल्हेकर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर तालुकास्तरीय समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम, पोलीस निरिक्षक किरण अवचर, सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत पाटील व समिती सदस्य उपस्थित होते.
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेवून तपासणी करावी. सामाजिक संघटनांनी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. आरोग्य यंत्रणेने लसिकरण केंद्राची संख्या वाढविण्यासाठी नियोजन करावे. कोविड केअर सेंटरसाठी इमारती अधिगृहित करुन आवश्यक सुविधा प्राधान्याने उपलब्ध कराव्यात, अशा सूचनाही तहसीलदार बेल्हेकर यांनी यावेळी दिल्या. यावेळी ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली.
सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणार
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत अधिसूचना व निमावली निर्गमित केली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे मास्कचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी न थुकणे, सामाजिक अंतराचे पालन करणे आदी सूचनांचा समावेश आहे. नियमांचे व सूचनांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.