सोलापूर लेबर फेडरेशनची निवडणूक प्रक्रिया सुरू
By राकेश कदम | Updated: May 29, 2023 11:10 IST2023-05-29T11:10:32+5:302023-05-29T11:10:39+5:30
जिल्हा उपनिबंधकांनी मागवले मतदार प्रतिनिधींचे ठराव

सोलापूर लेबर फेडरेशनची निवडणूक प्रक्रिया सुरू
सोलापूर : सोलापूर जिल्हा मजूर सोसायटी सहकारी फेडरेशनची प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी जिल्ह्यातील सहाय्यक निबंधकांना सोमवारी दिले. अकरा तालुक्यातील संलग्न संस्थांकडून मतदार प्रतिनिधींचे ठराव मागवण्यात आले आहेत.
लेबर फेडरेशनच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत पूर्ण होत आली आहे. नव्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी प्रारूप मतदार यादीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. 29 मे ते 29 जून या कालावधीत सोलापूर शहर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, माढा, मोहोळ आणि बार्शी तालुक्यातील संलग्न संस्थांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने मतदार प्रतिनिधी नियुक्त करण्याचा ठराव सादर करावा असे आदेश जिल्हा उपनिबंधक गायकवाड यांनी दिले आहेत.