सोलापूर मनपासाठी ५.५० कोटींचा निवडणुक खर्च

By Admin | Updated: January 24, 2017 19:37 IST2017-01-24T19:37:34+5:302017-01-24T19:37:34+5:30

सोलापूर मनपासाठी ५.५० कोटींचा निवडणुक खर्च

Election Expenditure of 5.50 crores for Solapur Municipal Corporation | सोलापूर मनपासाठी ५.५० कोटींचा निवडणुक खर्च

सोलापूर मनपासाठी ५.५० कोटींचा निवडणुक खर्च

सोलापूर मनपासाठी ५.५० कोटींचा निवडणुक खर्च
सोलापूर : महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी साडेपाच कोटी तिजोरीत शिल्लक ठेवण्यात आले आहेत.
राजकुमार सारोळे - सोलापूर
राज्य निवडणूक आयोगाने आठ महिन्यांपूर्वीच महापालिकेला निवडणूक खर्च स्वत:च करण्याची जबाबदारी असल्याचे कळविले होते. त्याप्रमाणे साडेपाच कोटी रक्कम बाजूला काढून ठेवण्यात आली आहे. स्थायी सभेत निवडणुकीला ४ कोटी १0 लाख खर्च होतील, असा अंदाज धरून प्रस्तावाला मंजुरी घेतली आहे. उर्वरित रक्कम अतिरिक्त खर्चासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून नॉर्थकोट प्रशालेत निवडणूक कार्यालय थाटून सर्व कारभार येथून सुरू करण्यात आला आहे. कार्यालयाबाहेर निवडणूक प्रशिक्षण व्यवस्थेसाठी स्टेज, मंडप, ध्वनिक्षेपक, राखीव जनरेटर, खुर्च्या, संगणक, प्रिंटर, आॅनलाईन माहिती भरण्यासाठी ब्रॉडबॅन्ड सेवा, स्टेशनरी, परिसरात धूळ उडू नये म्हणून दररोज टँकरने पाणी मारणे आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सध्याच्या कामासाठी मनपातील जवळजवळ चारशे कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत.
सहायक सात व अतिरिक्त एक असे निवडणूक अधिकारी दाखल झाले आहेत. या सर्वांची राहण्याची व्यवस्था कमीत कमी खर्चात करण्यात आली आहे. १0 मतदान केंद्रांसाठी एक झोन अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. अशा ७0 अधिकाऱ्यांसाठी ७0 वाहनांची मागणी करण्यात आली होती. केवळ सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनाच वाहने दिली जाणार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक झाल्यावर ६0 दिवसांच्या आत सर्व देयके अदा केली पाहिजेत, अशी अट घातली आहे. त्यामुळे निवडणूक खर्च कमी होईल, यावर लक्ष देत असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त विजयकुमार काळम यांनी दिली.
शेवटच्या क्षणी एबी फॉर्म
४अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाचे एबी फॉर्म व प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्यास मुभा दिली गेली आहे. प्रतिज्ञापत्रातील त्रुटीबाबत उमेदवारांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून किंवा ई-मेलद्वारे कळविले जाणार आहे. एकदा अर्ज केल्यानंतर या दोन गोष्टी वगळता इतर दुरुस्त्या करता येणार नाहीत. अर्ज स्वीकृतीची मुदत संपल्यावर कोणतीच तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. त्रुटी राहिल्यास छाननीत असे अर्ज बाद केले जाणार आहेत.

Web Title: Election Expenditure of 5.50 crores for Solapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.