Eight positives in Borala after Ajit Pawar's meeting | अजित पवारांच्या सभेनंतर बोराळेत आठ पॉझिटिव्ह

अजित पवारांच्या सभेनंतर बोराळेत आठ पॉझिटिव्ह

दिगवंत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रचार यंत्रणा राबवीत आहे.

दरम्यान, अनेक उमेदवार हे कोरोना नियमांचे उल्लंघन करीत गर्दी जमवत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

त्यातच शुक्रवारी बोराळेत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर झाली. या सभेसाठी नागरिकांनी गर्दी केली. त्यातच निवडणूक केवळ सहा दिवसांवर आहे. या दिवसांच्या कालावधीमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षाचे अनेक बडे उच्चपदस्थ सभेसाठी मंगळवेढ्यात येत आहेत. या सभेसाठी मतदार गोळा करत आहेत. त्यामुळे मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आज सभेमध्ये राष्ट्रवादीचे आजी- माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी दोघे जण हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत व्यासपीठावर उपस्थित होते.

Web Title: Eight positives in Borala after Ajit Pawar's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.