कार पलटी होऊन एकाच कुटुंबातील ३ मुलांसह आठ जण जखमी

By रूपेश हेळवे | Updated: January 31, 2023 12:33 IST2023-01-31T12:33:09+5:302023-01-31T12:33:15+5:30

देवदर्शनासाठी जात असलेल्या कर्नाटकातील भक्तांची कार पलटी होऊन एकाच कुटुंबातील आठ जण जखमी झाले आहेत.

Eight persons including 3 children of the same family were injured when the car overturned | कार पलटी होऊन एकाच कुटुंबातील ३ मुलांसह आठ जण जखमी

कार पलटी होऊन एकाच कुटुंबातील ३ मुलांसह आठ जण जखमी

सोलापूर :

देवदर्शनासाठी जात असलेल्या कर्नाटकातील भक्तांची कार पलटी होऊन एकाच कुटुंबातील आठ जण जखमी झाले आहेत. ही घटना तुळजापूर जवळ मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. 

कर्नाटकातील भालकी येथील एक कुटुंब पहाटे कर्नाटक येथून तुळजापूर येथील दर्शनासाठी निघाले, तुळजापूर जवळील एका गावाजवळ दगडावरून गाडीचे चाक गेल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून तेथेच गाडी पलटी झाली. यामुळे यात बसलेले गाडीतील तीन मुलांसह आठ जण जखमी झाले आहेत. नंदन अंबादास करूण ( वय ७ महिने), विद्यासागर मारूती करूण ( वय २८), शिवदास सोपान करूण ( वय ३२), श्रावणी श्रीमंत पुजारी ( वय ५), रेश्मा सोपान करुण ( वय ५५), समर्थ श्रीमंत पुजारी ( वय ६), मायादेवी अंबादास करूण ( वय ३२), शोभावती श्रीमंत पुजारी ( वय ३०, सर्व रा. भालकी, बिदर, कर्नाटक) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

Web Title: Eight persons including 3 children of the same family were injured when the car overturned