माढा तालुक्यात आठ ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:11 IST2021-01-08T05:11:06+5:302021-01-08T05:11:06+5:30

सोमवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक जण इच्छुक उमेदवारास माघारी घेण्यासाठी विनंती करत होते. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ...

Eight Gram Panchayats unopposed in Madha taluka | माढा तालुक्यात आठ ग्रामपंचायती बिनविरोध

माढा तालुक्यात आठ ग्रामपंचायती बिनविरोध

सोमवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक जण इच्छुक उमेदवारास माघारी घेण्यासाठी विनंती करत होते. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साहाय्यक पोलीस निरीक्षक अमूल कादबाने व फौजदार किरण घोंगडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रबोधनामुळे या निवडणुका बिनविरोध झाल्या. तर वेताळवाडी येथील वडाचीवाडी (उ बु) या दोन ग्रामपंचायतींमध्ये एका जागेसाठी निवडणूक लागली आहे. तालुक्यातील जाधववाडी येथील ओबीसी महिला व अनुसूिचत जाती पुरुष उमेदवारी अर्ज न आल्याने रिक्त राहिल्या आहेत.

-----

इतिहास..

निमगाव टे. येथील ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून बिनविरोधची परपंरा कायम राखली. जामगाव येथे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून बिनविरोध होण्याची परंपरा केवळ २०१४ साली खंडित झाली. त्यानंतर या वर्षी पुन्हा बिनविरोध झाली आहे.

---०४माढा ०१----

माढ्यातील शासकीय गोदामाजवळ अर्ज माघार घेण्यासाठी जमलेली गर्दी.

-----

Web Title: Eight Gram Panchayats unopposed in Madha taluka