शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चपळगावात आठ घरफोड्या; मुलीच्या लग्नासाठी आणलेल्या सोन्यावर चोरांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 17:53 IST

गावच्या पोलीस पाटलाचेही घर फोडले

चपळगाव - आधीच लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. यामूळे अनंत अडचणी निर्माण होत आहेत. ही वस्तुस्थिती सुरू असताना लाॅकडाऊनच्या पूर्वीच चपळगाव ता.अक्कलकोट येथील मनोज उपासे यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी आवश्यक बाबींची खरेदी केली व घरात आणून ठेवल्या. जेणेकरून लाॅकडाऊनमध्ये अडचणी निर्माण होऊ नयेत. मात्र लग्नापूर्वी ऐनवेळी चोरट्यांनी सोन्यावर डल्ला मारल्याने लग्नासाठी तयार असलेल्या उपासे कुटूंबावर संक्रात्र ओढवले आहे. विशेष म्हणजे उपासे यांच्यासह चपळगावातील आठ घरांमध्ये चोरट्यांनी सोने, रोकड व इतर साहित्यांवर डल्ला मारला आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी वादळ व पावसाने चपळगाव परिसरात रात्री वीजपुरवठा खंडित झाला. रात्रभर उकाडा व खंडित वीजपुरवठा यामुळे चपळगावातील जनतेने सोमवारची रात्र जागून काढली. यानंतर मंगळवारी वातावरण सुरळित झाल्याने रात्री ग्रामस्थ लवकर झोपी गेले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बहुतांश लोक गच्चीवर झोपी गेले. याचा फायदा चोरट्यांनी घेतला व डाव साधला. यामध्ये विशेषतः मनोज बसवराज उपासे व रेवणसिध्द बुगडे यांच्या घरात जबरी चोरी झाली आहे. 

       त्याच बरोबर त्याच गावातील रेवणसिद्ध पंडित बुगडे यांच्या घराचे कडी कोयांडा तोडून ९० हजार रुपये किंमतीचे तीन तोळे सोने त्यात एक बोरमाळ, कानातील सोन्याचे टॉप्स व ७० हजार रोख रक्कम असे एकूण १ लाख ६० हजाराचे ऐवज लंपास केले आहे. दीपक चन्नप्पा पाटील, यल्लव्वा मल्लप्पा साखरे,राचप्पा भिमाशंकर हन्नुरे,दीपक बसवण्णा पाटील, पोलीस पाटील चिदानंद हिरेमठ, शरणप्पा ख्याडे असे एक नाही आठ घरांची चोरी झाली आहे. एकाच रात्री आठ घरांची चोरी झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची खबर मनोज उपासे यांनी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यास दिली आहे. घटनास्थळी अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी, पो हे कॉ अजिंक्य बिराजदार, पो हे कॉ फिरोज मियावाले, पो हे कॉ आकाश कलशेट्टी, याच बरोबर सोलापूर ग्रामीणचे श्वान पथक व ठसे तपासणी पथक सोलापूर यांचे कर्मचारी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरThiefचोरakkalkot-acअक्कलकोट