शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भल्या पहाटेच पेटतात चुली; कानी येतो धाप... धाप... भाकरी थापल्याचा आवाज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 09:28 IST

माळशिरस परिसरात ऊसतोड मजुरांच्या वसाहतींमुळे घडतेय ग्रामीण संस्कृतीचे दर्शन

ठळक मुद्देसध्या माणूस स्थिरावला असला तरी पोटासाठी भटकंती थांबलेली नाहीग्रामीण संस्कृतीचे खरे दर्शन भटकंती करणाºया ऊस तोडणी कामगारमाळशिरस तालुक्यात ऊस तोडणीसाठी धुळे, जळगाव, बीड जिल्ह्यासह परराज्यातूनही मजूर

माळशिरस : पहाटेच्या वेळी शिवारात मोकळ्या जागी पालासमोर दिसणाºया मिणमिणत्या चुली... धाप.. धाप  वाजणारे भाकरीचे आवाज... जनावरांच्या गळ्यातील घंटीचा  खीण.. खीण.. आवाज हे चित्र सध्या शिवारात ऊस तोडणी कामगारांच्या खोप्यासमोर दिसत आहे.

माळशिरस तालुक्यात ऊस तोडणीसाठी धुळे, जळगाव, बीड जिल्ह्यासह परराज्यातूनही मजूर मोठ्या प्रमाणात ऊस तोडणीसाठी येतात यांची वस्ती शिवारात मोकळ्या जागी खोप्या करून पडलेली असते. ऊस तोडणी हंगामाच्या लगबगीमुळे दिवसभराची शिदोरी तयार करण्याची लगबग पहाटेपासूनच सुरू असते. यामुळे ग्रामीण जीवनशैलीचे विशिष्ट दर्शन या माध्यमातून आज घडत आहे.मानवी उत्क्रांती पासून  भटकंती मानवाच्या पदरी कायम होती.

सध्या माणूस स्थिरावला असला तरी पोटासाठी भटकंती थांबलेली नाही.  शहरी संस्कृतीचा पगडा राहणीमान व आहारावर सर्वत्र दिसत असला तरी आजही चुलीवरच्या भाकरीची ओढ अनेकांना खिळवून ठेवते. पहाटे लवकर उठून ऊस तोडणीसाठी निघण्यापूर्वी दिवसभर पुरेल एवढ्या भाकरीची शिदोरी बांधूनच खोप्यावरून निघावे लागते. त्यामुळे ग्रामीण संस्कृतीचे खरे दर्शन भटकंती करणाºया ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्यांमधून दिसून येत आहे.

चुलीवरील भाकरीची चवच न्यारी- विविध प्रकारचे गॅस, विद्युत शेगडी, ओहम अशा विशिष्ट प्रकारांमध्ये भाजलेले अन्न अनेकांच्या अंगवळणी पडलेले आहे. ज्वारी, बाजरीसह विविध प्रकारच्या धान्याच्या पिठापासून भाकरी बनवल्या जातात. याबरोबर भाजलेली वांगी, चटणी, भाज्या यांचा आस्वाद घेणे तर काही औरच असते. मात्र ग्रामीण भागातील चुलीवरील भाकरीची ओढ आजही कायम आहे. बाजरी अथवा ज्वारीच्या पिठापासून हाताच्या सहाय्याने गोलाकार बनवलेली भाकरी लोखंडी तव्यावर विस्तवाच्या उष्णतेवर विशिष्ट पद्धतीने  भाजल्या जाणाºया भाकरीची चवच मात्र न्यारी असते.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने