सोलापूर : कोर्टात वाद असताना बांधकाम का करता विचारल्यानं दोघांनी वृद्धाला केली दमदाटी

By विलास जळकोटकर | Updated: May 3, 2023 17:37 IST2023-05-03T17:37:04+5:302023-05-03T17:37:17+5:30

कोर्टामध्ये जागेचा वाद सुरु असताना बांधकाम का करता असं विचारल्यानं दोघांनी मिळून वृद्धाला शिव्या देऊन दमदाटी केली.

During the dispute in the court, both of them assaulted the old man for asking why he was doing construction | सोलापूर : कोर्टात वाद असताना बांधकाम का करता विचारल्यानं दोघांनी वृद्धाला केली दमदाटी

सोलापूर : कोर्टात वाद असताना बांधकाम का करता विचारल्यानं दोघांनी वृद्धाला केली दमदाटी

सोलापूर : कोर्टामध्ये जागेचा वाद सुरु असताना बांधकाम का करता असं विचारल्यानं दोघांनी मिळून वृद्धाला शिव्या देऊन दमदाटी केली. या प्रकरणी इनायतअली अब्दुल लतिफ कादरी (वय- ६७) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा मंगळवारी सायंकाळी नोंदला आहे.

सचिन खैरमोडे व चेतन खैरमोडे (रा. शुक्रवार पेठ, भोई गल्ली, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.फिर्यादी इनायतअली कादरी (वय- ६७, दक्षिण कसबा, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यातील संशयित आरोपी सचिन खैरमोडे व चेतन खैरमोडे यांचे शालिमार टॉकीजजवळ शेंगा चटणीचे दुकान आहे. येथे त्यांनी बांधकाम सुरु केले आहे. मात्र बांधकाम करीत असलेल्या जागेचा कोर्टात वाद सुरु आहे, बांधकाम करु नका म्हणून फिर्यादीने सोमवारी सायंकाळी त्यांनी विनंती केली.

यावरुन रागाच्या भरामध्ये वरील दोघांनी तक्रारदार वृद्धाला शिवीगाळ करुन दमदाटी केली. यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

Web Title: During the dispute in the court, both of them assaulted the old man for asking why he was doing construction