सोलापूर : महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेना यांची युती जाहीर झाली असली तरी दोन्ही पक्षांनी एकूण २२ ठिकाणी आमने सामने उमेदवार उभे केले आहेत. शुक्रवार, २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून आमने सामने असलेल्या ठिकाणी उमेदवारी मागे घेणार का, असे दोन्ही पक्षांतील नेत्यांना विचारले असता दोघांनीही साफ नकार दिला. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आमने सामने आहेत, त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढती लढू, असे सांगितले.
जिंकून येणार असल्याच उमेदवारांना आम्ही एबी फॉर्म दिले आहेत. शिंदेसेना तसेच अजित पवार गटाचे उमेदवार आमने सामने असल्यास त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू. उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात चर्चा होईल.
संतोष पवार, शहर व जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी (अजित पवार)
महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. १०२ ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी पक्षाने केली होती. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच अचानकपणे शिंदेसेनेची तसेच अजित पवार गटाची युती जाहीर झाली.
आजच्या बैठकीत तोडगा निघणार
दोघांच्या वाट्याला प्रत्येकी ५१ जागाही निश्चित झाल्या. असे असतानाही दोन्ही पक्षांनी निश्चित जागांपेक्षा ज्यादा २२ ठिकाणी उमेदवारांना एबी फॉर्म दिले. या ठिकाणी उमेदवार अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवेनात. त्यामुळे पक्ष पदाधिकाऱ्यांची अडचण झाली. शुक्रवारी दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या २२ ठिकाणांसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
पालिकेत शिंदेसेनेचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील. तसे आमचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदेसेना तसेच अजित पवार गटाची युती आहे. आमने सामने असलेल्या जागांवर सकारात्मक चर्चा होईल. अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही तयार आहोत.प्र.क्र.१-क१-ड२-ड१०- ब१०- क११-अ११- ब१३-क१३-ड१७-अ१७-ब१७-ड२०-ड२२-अअजित बनसोडे२२-ब२२-कतहेसीन शेख२२-ड२३-अअनिल बनसोडे२३-क२५-ब२५-क सुकेशनी गंगोंडा
या ठिकाणी आहेत आमने - सामने
राष्ट्रवादी (अजित पवार) शिंदेसेनेचे उमेदवारशुभांगी कळंबसिद्धाराम आनंदकरमुस्ताक पटेलदिपाली जाधवरूपेशकुमार भोसलेअहमद मोमीनलक्ष्मी बनसोडेदीपिका माळीदिनेश घोडकेइम्रान पठाणनूतन गायकवाडइब्राहिम कुरेशीनदाफ मोसीनमोहम्मद तौफिक शेखअंबिका जाधवजुबेर शेखचित्रा कांबळेलता गायकवाडवैभव हत्तुरे२६-कसागर हत्तुरेसपना कोळीसंजय सरवदेगणेश कुलकर्णीकृष्णवेणी कोंडाहेमलता गायकवाडलोकेश नंदालजयंत होले-पाटीलश्रीधर आरगोंडलक्ष्मी माढेकरसुमित मन्सावालेश्रीनिवास संगा, प्रभारी: मनपा पूर्व विभाग निवडणूक समिती, शिंदेसेनाअंबादास गोरंट्यालमोहसीन शेखसुधीर संगोपागअंजू गायकवाडअनिता बुक्कानुरेनितीन गायकवाडमदनलाल पोलकेधनंजय कारंडेप्रभाकर चौगुलेबसवराज बिराजदार
Web Summary : Despite a coalition, Shinde Sena and Ajit Pawar's NCP clash in 22 Solapur municipal seats. Both parties plan 'friendly fights' where candidates oppose each other after failing to reach a consensus in seat sharing talks.
Web Summary : गठबंधन के बावजूद, शिंदे सेना और अजित पवार की राकांपा सोलापुर नगर निगम की 22 सीटों पर आमने-सामने हैं। दोनों दलों ने सीटों के बंटवारे पर सहमति न बन पाने के बाद 'मैत्रीपूर्ण मुकाबले' की योजना बनाई है।