शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

विणी हंगाम काळातच उजनी धरणात बेसुमार मासेमारी झाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:23 IST

मत्स्यबीज घटले; लॉकडाऊननंतर मागणी वाढल्याचा परिणाम

ठळक मुद्देउजनी शंभर टक्के भरूनही पाहिजे त्या प्रमाणात मासे सापडत नाहीत़ असे चित्र सगळीकडे दिसते आहेगेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मासे अत्यल्प मिळत आहेत. लॉकडाऊननंतर माशांना मागणी वाढली आहे

अक्षय आखाडे

जेऊर : महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या उजनी धरणातील माशांना श्रावण आणि गणेशोत्सवानंतर महाराष्ट्रातून मागणी वाढली आहे. काठोकाठ भरलेल्या उजनीतील पाण्यात मच्छीमारांना मासे मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दरवर्षी उन्हाळ्यात उजनी जलाशयातील माशांना मागणी वाढते; मात्र यंदा लॉकडाऊन असल्याने उजनी जलाशयातील मासेमारी उन्हाळ्यामध्ये बंद होती. त्यानंतर या माशांना महाराष्ट्रातून मागणी आली़ परिणामत: उजनीत बेसुमार मासेमारी सुरु झाली.

 मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबर दरम्यान माशांचा विणीचा हंगाम असतो. ऐन विणीच्या हंगामात माशांना मागणी वाढली. या काळातच माशांचे बीज पाण्यात मोठ्या प्रमाणावर तयार होते. पण याच कालावधीमध्ये मासेमारी भरपूर झाली़ त्यामुळे पाण्यातील बीज कमी झाल्याने माशांची संख्या घटली आहे. उजनी जलाशयातील माशांचे प्रमाण कमी झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे़ सध्याच्या काळात पुणे आणि धरण परिसरातील पावसामुळे उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा आहे़ या जलाशयातील पाण्याचे प्रदूषण वाढल्याने गेल्या काही वर्षात इथल्या पाण्यात प्रामुख्याने चिलापी हा अत्यंत दूषित पाण्यातला मासा सापडतो़ धरणात सापडणाºया चिलापी या एकमेव  माशाचे प्रमाण देखील आता अत्यल्प ठरले आहे़ 

इंदापूर, भिगवणमध्ये होतो लिलाव  माशांसाठी इंदापूर आणि भिगवण हे दोनच मुख्य बाजारपेठ आहेत. उजनीकाठची ही मुख्य आणि मोठी गावे आहेत. शिवाय इथूनच उजनी जलाशयातील मासे शहरात पाठवले जातात. उजनी धरणाच्या शेजारील गावातील मासेमारी करणारे मच्छीमार इंदापूर आणि भिगवण येथे त्याची लिलाव पद्धतीने विक्री करतात़ येथूनच मासे इतर ठिकाणी वितरित होतात़ भिगवण येथील मासे हे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत़ 

उजनी शंभर टक्के भरूनही पाहिजे त्या प्रमाणात मासे सापडत नाहीत़ असे चित्र सगळीकडे दिसते आहे. याचे शास्त्रीय कारण असे सांगता येईल की मे ते आॅगस्ट या चार महिन्यात माशांचा विणीचा हंगाम असतो. या काळात माशाचे बीज पाण्यात मोठ्या प्रमाणावर तयार होते. पण याच कालावधीमध्ये जर मासेमारी भरपूर झाली़ पाण्यात बीज कमी प्रमाणात तयार होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम होतो.- विकास काळे, उजनीचे अभ्यासक, केत्तूर

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मासे अत्यल्प मिळत आहेत. लॉकडाऊननंतर माशांना मागणी वाढली आहे; मात्र पाण्यात वाढलेले गवत नासल्याने पाणी देखील दूषित झाले आहे. शिवाय मासे देखील मिळत नाहीत़- दत्तात्रय डिरे, केत्तूर (ता़ करमाळा)

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याUjine Damउजनी धरणwater pollutionजल प्रदूषण