शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या पहिल्या मासिक पाळीवेळी जेव्हा बाबांनाच आई बनावं लागलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 11:15 IST

पुरुषाला आईपण देणारी एकांकिका ‘थँक यू बाबा’ : जिल्ह्यातील विविध शाळेत होताहेत प्रयोग

ठळक मुद्दे‘थँक यू बाबा’ या एकांकिकेत मासिक पाळी या नाजूक विषयाला साद घातली मुलीला समजावून सांगणारी आई दाखविण्यापेक्षा वडील दाखविण्यात आले ही एकांकिका जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये दाखविण्यात येत आहे

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : वडील आणि त्यांची लाडकी मुलगी दोघेच तिच्या एका स्पर्धेसाठी बाहेरगावी जातात. या दरम्यान मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते. पहिल्यांदाच आलेल्या या अनुभवामुळे ती घाबरते. सोबतीला धीर देणारी आई नसते, अशा वेळी तिच्या बाबांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते? याचे भावनिक सादरीकरण ‘थँक यू बाबा’ या एकांकिकेतून करण्यात येत आहे. संकल्प युथ फाउंडेशनकडून जिल्ह्यातील विविध शाळांमधून या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात येत आहे. 

‘थँक यू बाबा’ या एकांकिकेत मासिक पाळी या नाजूक विषयाला साद घातली आहे. ही साद घालताना मुलीला समजावून सांगणारी आई दाखविण्यापेक्षा वडील दाखविण्यात आले आहे. ही एकांकिका जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये दाखविण्यात येत आहे. मासिक पाळीविषयी गैरसमज दूर होऊन घरातील पुरुषांनादेखील याविषयी माहिती मिळावी, हा या एकांकिकेचा उद्देश आहे. 

एका क्रीडा स्पर्धेसाठी ४२ वयाचे बाबा आणि १२ वर्षांची त्यांची मुलगी दुसºया शहरात जातात. त्याच दरम्यान मुलीला पहिल्यांदा पाळी येते. यामुळे मुलगी घाबरलेली असते. आपली मुलगी अशी का घाबरत आहे हे तिच्या बाबांना लक्षात येत नाही. ते तिच्या जॅकेटकडे पाहतात तेव्हा तिच्या जॅकेटला रक्त लागल्याचे दिसते. काही वेळ बाबांना देखील अशा वेळी काय करावे कळत नाही. मात्र, ही परिस्थितीच त्यांना आई बनवते. बाबा बाहेर जाऊन गरम पाण्याची बॅग, सॅनिटरी नॅपकिन, ज्यूस घेऊन जातात. मासिक पाळी येणे हे नैसर्गिक आहे. घाबरण्याचे कारण नाही, असे म्हणत मुलीला धीर देतात. मुलगी देखील बाबांचे ऐकत त्यांना ‘थँक यू बाबा’ असे म्हणते. एकांकिका झाल्यानंतर फक्त महिला, मुली, तरुणीच नाही तर तिथे असलेल्या पुरुषांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. मासिक पाळी नेमकी काय असते, त्यावेळी महिलांना कोणता त्रास होतो, याविषयी फारशी माहिती नसणाºया पुरुषांना ही एकांकिका एक चांगला धडा देते. यामुळे एकांकिका पाहणारी मंडळी बोलती होतात. 

ही एकांकिका मुलीसोबत बाबा आणि भावानेही पाहावी.. - थँक यू बाबा’ एकांकिका ही आई, मुलीसोबत बाबा आणि भावानेही पाहावी. घरामध्ये या विषयावर चर्चा व्हावी, जुन्या चालीरीती मोडाव्यात, गैरसमज दूर व्हावा, यासाठी याची निर्मिती केल्याचे संकल्प फाउंडेशनचे किरण लोंढे यांनी सांगितले. एकांकिकेचे लेखन पूजा काटकर हिने केले आहे. शहाजी भोसले, मनस्वी वाघमारे, सागर देवकुळे तसेच पूजा काटकर यांनी अभिनय केला आहे. संगीत सूरज भोसले, प्रकाशयोजना ओंकार साठे यांची आहे. 

‘थँक यू बाबा’ एकांकिकेत मी बाबाची भूमिका केली आहे. आपल्या गोंधळलेल्या मुलीला धीर देणारा एक बाबा आईची भूमिका बजावतो. खरे तर प्रसारमाध्यमातून आलेल्या माहितीच्या आधारे मासिक पाळी आल्यानंतर कोणती काळजी घ्यावी, याची बाबाला कल्पना असते. तरी आपल्या मुलीला कसे सांगावे हा देखील प्रश्न समोर असतो. यातून सावरत तो आपल्या मुलीला आधार देतो. - शहाजी भोसले, अभिनेता 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्य