शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यामुळे साेलापुरात झाडे पडली, अनेक भागात साडेचार तास वीज पुरवठा ठप्प

By राकेश कदम | Updated: May 26, 2024 21:23 IST

नागरिकांचे माेठे नुकसान : आपतकालीन यंत्रणाही राबली

राकेश कदम. साेलापूर : शहरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अक्कलकाेट राेड, हाेटगी राेड, जुळे साेलापूर, हत्तुरेवस्ती, शंकरनगर, नई जिंदगी भागात झाडे उन्मळून रस्त्यावर, विजेच्या तारांवर काेसळली. या भागातील वीजपुरवठा सायंकाळी साडेपाच ते नऊ वाजेपर्यंत बंद हाेता. महापालिकेचे आपतकालीन पथक, वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना तारांवर काेसळलेली झाडे हटविण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले.

सायंकाळी पाचच्या सुमाराला ढग दाटून आले. वारे वाहू लागले. यादरम्यान महापालिकेच्या आपतकालीन कक्षात विविध भागांत नुकसान झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. नगर अभियंता सारिका आकुलवार, उपअभियंता युसूफ मुजावर यांनी नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना या भागात जाऊन रस्त्यावर पडलेली झाडे, साहित्य हटविण्याच्या सूचना केल्या.

अक्कलकाेट राेड भागातील राजूनगरमध्ये झाड काेसळले. या भागातील रहिवाशी, मनपाच्या आपतकालीन पथकाने सायंकाळी सहा वाजता झाड बाजूला काढले. वीजपुरवठा सुरू व्हायला बराच वेळ लागला. जुळे साेलापुरातील बाॅम्बे पार्क, गंगाधरनगर भागात वाऱ्यामुळे झाडे काेसळली. विमानतळाच्या समाेर हत्तुरेवस्ती भागातील झाडे रस्त्यावर काेसळली. विजेच्या तारा तुटल्या, खांबशंकरनगर भागातील बिराेबा मंदिराजवळचे ५० वर्षांपूर्वीचे झाडही तारांवर काेसळले. मजरेवाडी ते सिद्धेश्वर कारखाना परिसरातील वीजपुरवठा साडेचार तास बंद हाेता, असे माजी नगरसेवक सुभाष शेजवाल आणि वैभव हत्तुरे यांनी सांगितले.महापाैर बंगलाच्या मागील झाडही विजेच्या तारांवर काेसळले. हे झाड हटविण्यासाठी पथकाला बरेच परिश्रम घ्यावे लागले.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊस