शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाऊनमुळे सेतूमध्ये रात्री उशिरापर्यंत दाखले देण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 14:35 IST

सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गर्दी; प्रशासनाकडून गतीमान कारभारर्

ठळक मुद्देदहावी व बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर राज्यभर आॅनलाईन प्रवेश देण्याचे कामकाज सुरूसर्व्हर डाऊन होत असल्याने सेतू कार्यालयात दाखले वितरित करण्यास अडचण मंगळवारपर्यंत २५३० अर्ज आले होते, त्यातील जवळपास २३९० अर्ज निकाली काढण्यात आले

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयातील सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत कर्मचारी थांबून विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले देण्याचे काम सुरू आहे. 

दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर राज्यभर आॅनलाईन प्रवेश देण्याचे कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊन होत असल्याने सेतू कार्यालयात दाखले वितरित करण्यास अडचण येत आहे. श्रीनिवास पाटील व शुभम वल्लभदेशी यांनी नॉनक्रिमीलेअर दाखला मिळण्यास विलंब होत असल्याची बुधवारी तक्रार केली. यावर सेतू तहसीलदार जयंत पाटील यांना विचारले असता, सर्व्हर डाऊनमुळे अडचणी येत आहेत, पण कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय होऊ देत नसल्याची माहिती दिली. मंगळवारपर्यंत २५३० अर्ज आले होते, त्यातील जवळपास २३९० अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. 

शनिवारी सर्व्हर पूर्णत: बंद पडले होते. गेल्या दोन दिवसात सर्व्हरची गती मंद आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सर्व्हरची गती अत्यंत कमी होते. त्यामुळे दाखल्यासाठी आलेल्या अर्जांची माहिती व कागदपत्रे अपलोड करण्यात अडचण येत आहे. दाखल्यांसाठी आलेल्यांना टोकण देऊन सर्व्हर सुरू झाल्यावर दाखले वितरित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रात्री अकरा ते बारापर्यंत सेतू कार्यालयाचे काम सुरू आहे. दिवसभरातील अर्जांची पूर्तता करून रात्री दाखले वितरित करण्याचे काम सुरू होते.

असे चालते कामच्नॉनक्रिमीलेअर, उत्पन्न, जातीच्या दाखल्यांसाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारला जातो. अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे दाखल करून घेण्यासाठी एका लिपिकाची नियुक्ती केली आहे. अव्वल कारकून ही कागदपत्रे तपासून तातडीने तहसीलदारांकडे पाठवितात. तहसीलदारांकडून सहीनंतर ही फाईल पुन्हा सेतूमध्ये आल्यावर दाखले वितरणाचे काम होते. सेतू, प्रांत आणि तहसील कार्यालयात सध्या दाखले वितरणासाठी खास कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांनी अर्ज करताना कागदपत्रांची योग्य जुळणी करणे आवश्यक आहे. त्रुटी निघालेल्या अर्जांना विलंब होतो. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयEducationशिक्षणSchoolशाळा