शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उन्हामुळे स्मशानभूमीतील झाडांची थंड सावलीही वाटू लागली हवीहवीशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 15:01 IST

दुपारची विश्रांती प्रेतांसमवेत; सोलापुरातील शालेय-महाविद्यालयीन मुलांसाठी जणू अभ्यासाचे केंद्रच

ठळक मुद्दे नेहमी शेळ्या, म्हशी चरण्यासाठी येणारे गुराखीही झाडाखाली विश्रांतीसाठी थांबतातकाही मनोरुग्णही स्मशानभूमीत विश्रांती घेतातगर्दी, गोंधळापासून दूर स्मशानभूमीसारख्या ठिकाणी शांतता असते

यशवंत सादूल

सोलापूर : प्रेताचं दहन असो अथवा दफन... अंत्यविधी आटोपताच कधी एकदा पाय स्मशानभूमीच्या गेटबाहेर पडतील, हाच विचार मनी येतो. कानावर पडणाºया चित्र-विचित्र आवाजांचा भास... कावळ्यांचा कावकाव... त्यातच जळणारी प्रेते अशा स्थितीतही स्मशानभूमीतही दुपारची वामकुक्षी घेणारे काही डेअरर सोलापूरकरही पाहावयास मिळतात.

जगाचा निरोप घेतल्यानंतर पार्थिव देह अंत्यविधीसाठी स्मशानात नेतात, त्यावेळी आप्तस्वकिय हजर असतात. दु:खाचा प्रसंग, स्मशानभूमीतील सुतकी, दूषित वातावरण यातून बाहेर पडणाºया लोकांना तेथील तास-दीड तासाचा कालावधीही नकोसा वाटत असतो. अंत्यसंस्कार झाल्यानंतर मात्र  शांत झालेल्या वातावरणात वाढलेली झाडी, मोकाट जनावरांचा मुक्त वावर, प्रेत जळताना सुटणारा दुर्गंध अशी तेथील परिस्थिती असते.

सर्वसामान्य माणसाचा अत्यंत कमी वावर असतो, मात्र अशा ठिकाणी दुपारची वामकुक्षी घेण्यासाठी एखादी व्यक्ती आली नि चक्क थडग्यावरच झोपी गेली तर मात्र नवलच वाटेल. हा प्रत्यक्ष अनुभव सोमवारी पाहावयास मिळाला तो मोदी येथील मोरे हिंदू स्मशानभूमीत. याबद्दल तेथील कर्मचारी, सेवकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, असे अनेकदा घडते. बहुतेक करून दुपारी स्मशानात वर्दळ कमी असते़ काही लोकांना येथे छान झोप लागते म्हणून येतात, असे सांगितले़ 

सुखी माणसे !- नेहमी शेळ्या, म्हशी चरण्यासाठी येणारे गुराखीही झाडाखाली विश्रांतीसाठी थांबतात. क्वचित प्रसंगी तेही डुलकी मारतात. काही मनोरुग्णही स्मशानभूमीत विश्रांती घेतात, परंतु गर्दी, गोंधळापासून दूर स्मशानभूमीसारख्या ठिकाणी शांतता असते़ त्यातच सोलापूरचा पारा चाळीस अंशावर वाढत जात असताना येथील थंडगार जागा काहींना भुरळ पाडते आणि कशाचीही तमा न बाळगता खुशालपणे  तेही येथील थडग्यावर झोपणारे खरोखरच जगातील सर्वात सुखी माणसे असतील, असे म्हणायला काही हरकत नाही़ 

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमानEducationशिक्षणSchoolशाळा