शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

कोरोनामुळे राज्यातील ६४ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 13:05 IST

कोरोनाचे कारण: साखर कारखाने, जिल्हा बँका, सूत गिरण्यांचा समावेश

ठळक मुद्देराज्यात नव्याने काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केलीकर्जमुक्तीची अंमलबजावणी सुरू असल्याने मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता

अरूण बारसकर   सोलापूर : साखर कारखाने, दूध संघ, सूत गिरणी, सहकारी बँका, जिल्हा बँका तसेच विकास  सोसायट्यांच्या संचालकांना मार्च २०१९ पासून मुदतवाढ मिळत आहे. येत्या मार्चपर्यंत संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाल्याने ६४ हजार ३५३ संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आता मार्चनंतर सहकार क्षेत्रात निवडणुकीचा धडाका उडणार की, आणखीन मुदतवाढ मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

राज्यात नव्याने काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. कर्जमुक्तीची अंमलबजावणी सुरू असल्याने मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे मार्च २०१९पर्यंत व त्यानंतर मुदत संपलेल्या संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. मार्च २०२०मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पुन्हा मुदत संपलेल्या सर्वच संस्थांच्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर दर तीन महिन्यांनी स्वतंत्र आदेश काढून सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. 

जानेवारी २०२१ महिन्यापासून निवडणुकीचा धडाका सुरू होईल, असे सांगण्यात येत असताना १६ जानेवारी रोजी आदेश काढून मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये साखर कारखाने, सूत गिरण्या, दूध संघ, गृहनिर्माण संस्था, सहकारी बँका, जिल्हा बँका, विकास सोसायट्या, पतसंस्था व इतर ६४ हजार ३५३ सहकारी संस्थांचा समावेश आहे.

२० जिल्हा बँकांनाही मुदतवाढराज्यातील २० जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने मुदतवाढ मिळत आहे. गडचिरोली जिल्हा बँक, पुणे जिल्हा बँक,  औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक, बीड जिल्हा बँक,  लातूर जिल्हा बँक, अकोला जिल्हा बँक, परभणी जिल्हा बँक, मुंबई जिल्हा बँक,  नांदेड जिल्हा बँक, जळगाव जिल्हा बँक, रत्नागिरी जिल्हा बँक, धुळे व नंदुरबार जिल्हा बँक, अहमदनगर मध्यवर्ती बँक, ठाणे जिल्हा बँक, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, उस्मानाबाद जिल्हा बँक, सातारा जिल्हा बँक, नाशिक मध्यवर्ती, सांगली व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचा समावेश आहे.

सोलापूरचे सहा कारखाने सोलापूर जिल्ह्यातील श्री. संत दामाजी मंगळवेढा, श्री. विठ्ठल गुरसाळे, श्री. पांडुरंग श्रीपूर, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर, श्री. संत कुर्मदास माढा व भीमा सहकारी टाकळी सिकंदर या साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपत असल्याने निवडणुकीला पात्र आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील बारा दूध संघ दूध व्यवसायात अग्रेसर असलेले पश्चिम महाराष्ट्रातील १२ सहकारी दूध संघ निवडणुकीला पात्र आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ), पुणे जिल्हा दूध संघ (कात्रज), सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ (दूधपंढरी), वसंतदादा पाटील जिल्हा दूध संघ, तासगाव, राजारामबापू पाटील तालुका दूध संघ, इस्लामपूर, शेतकरी कवठे महांकाळ दूध संघ, मोहनराव शिंदे दूध संघ, मिरज, पाटण तालुका दूध संघ, फलटण तालुका दूध संघ, सातारा तालुका दूध संघ, लोकनेते हणुमंतराव पाटील दूध संघ,  विटा व खंडाळा तालुका दूध संघ यांचा समावेश आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूकPoliticsराजकारणSugar factoryसाखर कारखानेMilk Supplyदूध पुरवठा