कारच्या धडकेने शाळकरी मुलगी ठार जुळे सोलापुरातील घटना :
By Admin | Updated: May 11, 2014 01:09 IST2014-05-11T01:09:16+5:302014-05-11T01:09:16+5:30
कारचालकाचे पलायन

कारच्या धडकेने शाळकरी मुलगी ठार जुळे सोलापुरातील घटना :
सोलापूर : भरधाव जाणार्या कारने ठोकरल्याने शाळकरी मुलगी जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी जुळे सोलापुरातील चैतन्य शॉपिंग सेंटरसमोर घडली. अपूर्वा भगवान कुलकर्णी (वय १५, रा. रामलिंगनगर,विजापूर रोड सोलापूर) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. ती जुळे सोलापुरातील मेहता प्रशालेत दहावीत शिकत होती. शनिवारी दुपारी चार वाजता तास संपवून ती घराकडे पायी चालत निघाली होती. चैतन्य शॉपिंग सेंटरसमोर पाठीमागून आलेल्या पांढर्या रंगाच्या कारने तिला ठोकरले. ेअपघातानंतर कारचालक वाहनासह पळून गेला. घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. पण तिला उपचारास नेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. तेथून जाणारे संजय बुधले हे गर्दी पाहून थांबले. त्यांनी तातडीने हाकेच्या अंतरावर असलेल्या विजापूरनाका पोलिसांना कळविले पण कोणीही आले नाही. त्यामुळे त्यांनी तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले पण तोवर उशीर झाला होता. तिचे वडील भगवान यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. एका सुमो चालकाने पाठलाग करून कारचा क्रमांक टिपला आहे.