दुधनी खून प्रकरण, आणखी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:24 IST2021-03-23T04:24:11+5:302021-03-23T04:24:11+5:30
तीन दिवसांपूर्वी दुधनी येथील शेतकरी रमेश निंबाळ यांचा त्याचे मित्र सैदप्पा व्हसुरे यांनी घरातून बळजबरीने घेऊन जाऊन खून केल्याचे ...

दुधनी खून प्रकरण, आणखी एकास अटक
तीन दिवसांपूर्वी दुधनी येथील शेतकरी रमेश निंबाळ यांचा त्याचे मित्र सैदप्पा व्हसुरे यांनी घरातून बळजबरीने घेऊन जाऊन खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यामध्ये सैदप्पा यास यापूर्वीच अटक करून कोर्टासमोर उभे केले असता २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर रविवारी रात्री आरोपी सैदप्पा याचा मुलगा चन्नप्पा सैदप्पा व्हसुरे वय-२० हा सुद्धा या खुनात सहभागी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला आहे. चनप्पा यास सोमवारी येथील न्यायाधीश जी. बी. नंदागवळे यांच्यासमोर उभे केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे. फिर्यादीतर्फे सरकारी वकील गिरीश सरवदे यांनी काम पाहिले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड हे करीत आहेत.