टिपर पायावरून गेल्याने चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST2021-05-12T04:23:10+5:302021-05-12T04:23:10+5:30

मंगळवेढा : टिपरचे चाक पायावरून गेल्याने युवकाचा मृत्यू झाला. भिवदास नवनाथ चोरमले (वय २२, रा. लोणार, तालुका मंगळवेढा) असे ...

Driver dies after tipper goes off foot | टिपर पायावरून गेल्याने चालकाचा मृत्यू

टिपर पायावरून गेल्याने चालकाचा मृत्यू

मंगळवेढा : टिपरचे चाक पायावरून गेल्याने युवकाचा मृत्यू झाला.

भिवदास नवनाथ चोरमले (वय २२, रा. लोणार, तालुका मंगळवेढा) असे मरण पावलेल्या युवकाचे नाव असून, मंगळवेढा तालुक्यातील लोणार येथे दगड खाणीत सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

याबाबत आबासाहेब रघुनाथ चोरमले यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार भिवदास चोरमले हा गावाशेजारील खाणीमध्ये दगड भरण्यासाठी टिपर घेऊन गेला होता.

अचानक टिपर नादुरुस्त झाल्यामुळे गाडीचे हँड ब्रेक लावून तो गाडीखाली जॉइंटचे काम करत होता. इतक्यात गाडीचा हँड ब्रेक निसटला व गाडी पाठीमागे आली. गाडीचे चाक पायावरून गेले. तत्काळ त्याला उपचारासाठी नेत असताना तो उपचारापूर्वीच मरण पावला.

अधिक तपास पोलीस हवालदार निंबाळे करीत आहेत.

Web Title: Driver dies after tipper goes off foot