उलटलेल्या ट्रॅक्टरखाली सापडून चालकाचा मृत्यू ; सांगोल्यात जानकर वस्ती येथील घटना
By काशिनाथ वाघमारे | Updated: June 25, 2023 21:01 IST2023-06-25T21:00:51+5:302023-06-25T21:01:09+5:30
या घटनेत ट्रॅक्टर खाली सापडून चालक गंभीर जखमी हाेऊन मरण पावला.

उलटलेल्या ट्रॅक्टरखाली सापडून चालकाचा मृत्यू ; सांगोल्यात जानकर वस्ती येथील घटना
सोलापूर : ट्रॅक्टरने शेत रोटरुन बांधावरून घरी येत असताना अचानक पलटी झाला. या घटनेत ट्रॅक्टर खाली सापडून चालक गंभीर जखमी हाेऊन मरण पावला.
विजय दशरथ जानकर (वय २८, रा. सांगोला) असे मरण पावलेल्या चालकाचे नाव असून ही घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सांगोल्यात जानकर वस्ती येथे घडली. याबाबत संतोष माकाप्पा जानकर यांनी पोलिसात खबर दिली आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, ट्रॅक्टरचे चारीही टायर उलटून त्याखाली चालक संतोष सापडून डोक्यास गंभीर मार लागून मरण पावला.
जानकर वस्ती येथील संतोष म्हाकाप्पा जानकर यांचा पुतण्या विजय दशरथ जानकर हा त्याच्या स्वतःच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहे. तो लागेल तेथे ट्रॅक्टरने भाडे मारुन कुटुंबाला हातभार लावत होता. दरम्यान रविवार, २५ जून रोजी सकाळी ८ च्या सुमारास त्याच्या घराशेजारील स्वतःच्या शेतात ट्रॅक्टरने रोटरण्यासाठी गेला होता. शेत रोटरुन झाल्यावर सकाळी १० च्या सुमारास ट्रॅक्टर घेऊन घरी येत असताना बांधावरून पलटी झाला.
ट्रॅक्टरच्या खाली सापडून विजय गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरता भाऊ पांडुरंग जानकर यांनी सांगोला ग्रामीण रुग्णालय दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.