शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

धाब्यावर दारू पिणे पडले महागात; हॉटेल चालकासह १३ जणांना ३१ हजार ५०० रुपयांचा दंड

By appasaheb.patil | Updated: September 29, 2022 18:39 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची मोठी कारवाई

सोलापूर : हॉटेलवर दारू पिणे बेकायदेशीर असतांना सोलापूर -हैद्राबाद रोडवरील हॉटेल मातोश्री ढाबा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला असता  हॉटेल च्या चालकासह १३ मद्यपीं अटक करण्यात आली.  

सविस्तर वृत्त असे की, २८ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवरील हॉटेल मातोश्री येथे धाड टाकली असता हॉटेल चालक  नेताजी लिंबाजी जगताप (रा. दहिटने ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर) यांच्यासह त्याच्या हॉटेलमध्ये अवैध रित्या दारु पिण्याकरिता बसलेल्या १३ मद्यपींना अटक करुन ताब्यात घेतले. अटक आरोपींच्या ताब्यातून ३०५५ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयाचे तपास अधिकारी यांनी २४ तासात तपास पूर्ण करून गुरुवारी २९ सप्टेंबर रोजी  गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने तात्काळ निकाल देत हॉटेलचालक यास २५ हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रू. ५००- प्रमाणे असा एकूण ३१ हजार ५०० रूपयांचा दंड ठोठावला आहे.     सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक व उप अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अंकुश आवताडे, उषा किरण मिसाळ व सहायक दुय्यम  निरीक्षक बिराजदार, मुकेश चव्हाण, जवान शोएब बेगमपुरे, प्रियंका कुटे, चेतन व्हनगुंटी, प्रशांत इंगोले व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने  पार पाडली असून सदर गुन्ह्याची फिर्याद चेतन व्हनगुंटी यांनी दिली असुन तपास पुष्पराज देशमुख दुय्यम निरीक्षक अ-2 विभाग, सोलापूर यांनी पूर्ण केला.    राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आवाहनधाब्यावर दारू पिणे तसेच दारू पिण्याकरिता व्यवस्था उपलब्ध करून देणे हे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा आहे,  नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अवैध धाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारू पिताना आढळून आल्यास त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरExcise Departmentउत्पादन शुल्क विभागCrime Newsगुन्हेगारी