वैराग येथे विविध उपक्रमांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:21 IST2021-04-16T04:21:21+5:302021-04-16T04:21:21+5:30

वैराग : वैराग येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना, वंचित बहुजन आघाडी व सिद्धार्थ तरुण मंडळ वैराग यांचे वतीने ...

Dr. Vairag through various activities. Greetings to Ambedkar | वैराग येथे विविध उपक्रमांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन

वैराग येथे विविध उपक्रमांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन

वैराग : वैराग येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना, वंचित बहुजन आघाडी व सिद्धार्थ तरुण मंडळ वैराग यांचे वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी मानवीहक्क आयोगाचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र निंबाळकर शैला बोधे, किरण वाघमारे, श्रीदेवी वाघमारे, शोभा घोडके, सविता जाधव, प्रफुल्ल भालशंकर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी खाऊ वाटप करण्यात आले. येथे कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे महेंद्र लोंढे, सुरज वाघमारे, अरविंद माने, राजकुमार कसबे, अमोल वाघमारे, अमोल ठोंबरे, शुभम वाघमारे, संतोष भालशंकर, विशाल भालशंकर, सोमनाथ कसबे, अनिल सकट, पेंडी भालशंकर उपस्थित होते.

----

१४ वैराग

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना महेंद्र निंबाळकर, शैला बोधे, किरण वाघमारे, श्रीदेवी वाघमारे, शोभा घोडके, सविता जाधव.

Web Title: Dr. Vairag through various activities. Greetings to Ambedkar