शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकीत डीजेला परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 11:59 IST

पालकमंत्र्याचा पोलिसांना निरोप; लोकांच्या आनंदावर विरजण टाकू नका

सोलापूर : गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट गडद होते. त्यामुळे सोलापूर जिल्हावासियांना खूप त्रास झाला. आता कोरोनाचे संकट संपत चालले आहे. शिवाय विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. अशा स्थितीत त्यांच्या आनंदावर विरजण न टाकता इतर जिल्ह्यात डीजेच्या परवानगीबाबत काय निर्णय झाले आहेत. याची माहिती घेऊन सोलापुरातही डीजेला परवानगी द्यावी. असा निरोप पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांना दिला आहे.

गेल्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी होत आहे. कोरोना संकट संपत चालल्याने लोकांमध्ये खूपच आनंदाचे वातावरण आहे. अशा स्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत डीजे वापरण्याला परवानगीने देणार नाही. अशी भूमिका पोलीस आयुक्त बैजल यांनी घेतली. त्यावरून आंबेडकरप्रेमींनी मोर्चा काढून आंदोलनही केले. ही बाब समजताच तातडीने पालकमंत्री भरणे यांनी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला. सुप्रिम कोर्टाचे आदेश आहेत हे जरूर पाहावे. कायद्याच्या चाकोरीत बसून डीजे वापरण्याला परवानगी कशा पद्धतीने देता येईल याचा विचार करा. विनाकारण अडेलतट्टू भूमिका घेऊन लोकांच्या आनंदावर विरजण टाकू नका. इतर जिल्ह्यात डीजे वापरण्याबाबत काय निर्णय झालेत याची माहिती घ्या. आणि सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत डिजे वापरण्याला परवानगी द्या. असा निरोप पालकमंत्र्यांनी पोलिस आयुक्तांना दिला. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस