डॉ. नेनेंच्या कन्येने नर्गिस हॉस्पिटलचा विषय पोहोचविला मुख्यमंत्र्यांपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:21+5:302021-08-21T04:26:21+5:30
नर्गिस कॅन्सर हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल (भारत सरकार) यांना देण्याबाबत मागील दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहेत. नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

डॉ. नेनेंच्या कन्येने नर्गिस हॉस्पिटलचा विषय पोहोचविला मुख्यमंत्र्यांपर्यंत
नर्गिस कॅन्सर हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल (भारत सरकार) यांना देण्याबाबत मागील दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहेत. नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांशी व्ही. सी.द्वारे चर्चा करीत संवाद साधला. यात कॅन्सर हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. बी. एम. नेने यांच्या केनिया स्थित कन्या ज्योती नेने-त्रिपाठी यांनी वडिलांच्या इच्छेनुसार नर्गिस हॉस्पिटल हे शासनास समर्पित करण्याची विनंती केली. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विषय गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना तत्काळ अहवाल देण्याचा आदेश दिला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रांताधिकारी हेमंत निकम व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांना तत्काळ अहवाल देण्यास सांगितले.
...........
या मुद्द्यावर मागविला अहवाल
हॉस्पिटलची स्थापना केव्हा झाली?, हॉस्पिटल स्थापना होताना केलेली घटना असेल तर तिची प्रत, सध्या हॉस्पिटलमध्ये किती कर्मचारी कार्यरत आहेत, बेडची संख्या, उपलब्ध सोयी-सुविधा व यंत्रसामग्री, हॉस्पिटलच्या नावे असलेल्या एकूण जागेचे क्षेत्र, मागील पाच वर्षांचे ताळेबंद पत्रक, रुग्णालय शासनास देण्याबाबत संचालक मंडळाचा ठराव आहे किंवा कसे, या मुद्द्यांवर अहवाल मागितला आहे.