शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तुमची वीज नको... आम्ही आमचे समर्थ आहोत...; अख्खं गाव करतंय सोलार पंपावर शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 06:18 IST

माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळ अगदी भीमा नदीलगत असलेल्या बेंबळे गावात २६०० हेक्टर बारमाही बागायत आहे. मात्र, पुरेशा दाबाने वीज मिळत नव्हती. 

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : एक गाव असे आहे.. जिथल्या सगळ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी वाहतेय ते सोलार पंपाद्वारे.. ७-८ वर्षांखाली ५ सोलार पंप बसविले अन् यशस्वी झाल्याने आज जिल्ह्यातील बेंबळे गावात ४२५ सोलार पंपावर ऊस, केळी, डाळिंब, पेरू व इतर पिके घेतली जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक सोलार पंपावर शेती फुलवणारे गाव अशी बेंबळेची ओळख झाली आहे. 

माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळ अगदी भीमा नदीलगत असलेल्या बेंबळे गावात २६०० हेक्टर बारमाही बागायत आहे. मात्र, पुरेशा दाबाने वीज मिळत नव्हती. 

प्रारंभी कुणाचा विश्वासच बसेनाशेतीसाठी सोलार पंप बसविण्याची कल्पना पुढे आली. सोलार पंप बसविण्यासाठी जयवंत भोसले अग्रेसर होते. अजित जैन यासाठी सहकार्य करण्यास तयार होते.मात्र, सोलारवर मोटारी चालतील यावर शेतकऱ्यांचा विश्वास बसेना. जयवंत भोसले हे सहकारी शेतकऱ्यांना सोबत घेत तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांना भेटले. डाॅ. भोसले यांनीही बेंबळे गावचे सिंचन क्षेत्र व वीज पुरवठ्याची परिस्थिती लक्षात घेऊन १०० सोलार पंप बसविण्यास परवानगी दिली.मात्र शेतकरी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुढे येत नव्हते. कशाबशा ५ महिला शेतकरी तयार झाल्या व शेतकरी हिस्सा भरून सोलार पंपावर शेती सुरू झाली. 

शेतीपंप किती?सध्या साडेसात एच.पी. चे ११, ५ एच.पी. चे २६० व तीन एच.पी. चे १५५ शेतीपंप आहेत. 

गावातील संपूर्ण शेतकऱ्यांना सोलारवर शेती करायची आहे. पेंडिंग अर्ज मंजूर झाले तर पुढील वर्षात सोलार पंपाची संख्या ६०० होईल. विजेची कटकट कमी झाली व दिवसभर शेतीला पाणी देता येते. - जयवंत भोसले, कृषिनिष्ठ शेतकरी, बेंबळे, माढा

टॅग्स :Farmerशेतकरी