शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अफवा पसरवू नका; पंढरपूर तालुक्यातील त्या दोघांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 15:28 IST

पंढरपूर आरोग्य विभागाचे आवाहन; अफवेची पथकामार्फत केली चौकशी...

ठळक मुद्देआढिव ( ता. पंढरपूर) येथे ही एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत झाल्याची अफवा होतीत्यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी पथक पाठवलेपाटोळे यांची कोरोनाची चाचणी झाली. त्या चाचणी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील आढीव व तारापूर गावामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याची बुधवारी सकाळी पासून चर्चा सुरू आहे. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नाही, ही केवळ अफवाच असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.

तारापूर येथे मुंबई येथून दादासाहेब बाबा सावंत हे आले होते. सावंत यांचा मंगळवारी मृत्यू झाला होता. त्या चे पार्थिव मंगळवेढा तालुक्यातील सेलीवाडी येथे नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत प्रशासनाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. परंतु याबाबतची माहिती पंढरपूर गटविकास अधिकारी रविकिरण घोडके व आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तात्काळ त्याठिकाणी पथक पाठवले. संबंधित इसमाची इतिहास जाणून घेतला असता त्याला कोरणा ची लागण झाली नव्हती. व त्याचा मृत्यू नैसर्गिक झाला होता. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या घरातील सर्व पाहुण्यांना संस्थात्मक कॉरंटाईनवर करण्यात आले आहे. 

त्याचबरोबर आढिव ( ता. पंढरपूर) येथे ही एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत झाल्याची अफवा होती. त्यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी पथक पाठवले.

विजय दगडू पाटोळे ( वय ५५) हे कुटुंबासह पुणे येथून आढीव (ता. पंढरपूर) येथे आले होते.  त्यांचा मृत्यू बुधवारी पहाटे झाला. त्यामुळे तत्काळ संबंधित व्यक्तीचा इतिहास जाणून घेतला.  पाटोळे यांची कोरोनाची चाचणी झाली. त्या चाचणी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्याचा मृत्यू पोटात पाणी, कावीळ, रक्त कमी असणे या आजारामुळे झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPandharpurपंढरपूर