दारू विकून लोकांचे संसार उद्ध्वस्त करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST2021-09-07T04:27:40+5:302021-09-07T04:27:40+5:30

पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे ऑपरेशन परिवर्तनअंतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींना पोलीस ठाण्यास बोलावून त्यांना ...

Don't ruin people's world by selling alcohol | दारू विकून लोकांचे संसार उद्ध्वस्त करू नका

दारू विकून लोकांचे संसार उद्ध्वस्त करू नका

पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे ऑपरेशन परिवर्तनअंतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींना पोलीस ठाण्यास बोलावून त्यांना या व्यवसायापासून परावृत्त होण्यासाठी पोनि. अरुण पवार यांनी मार्गदर्शन केले. समाजात त्यांची असलेली प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांनी नवीन इतर कामधंदा करण्यासाठी विविध शासकीय योजना, विकास मंडळ यांची मदत मिळू शकते, याची कल्पना दिली.

पोलिसांनी अवैध दारू विक्री होणाऱ्या ५ ठिकाणी धाड टाकून ५ केस केल्या आहेत. यापुढे दारूविक्री करताना आढळणाऱ्यांवर मोठ्या शिक्षेच्या कलमाखाली कायदेशीर कडक कारवाई केली जाणार असल्याची जाणीवदेखील करून दिली. यावर संबंधित लोकांनी इतर काही तरी व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या व्यक्तीच्या कुटुंबाची व त्यांच्या उत्पन्नबाबत माहिती घेतली असल्याचे पोनि. अरुण पवार यांनी सांगितले.

फोटो ::::::::::::::::::::::

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अवैध व्यावसायिकांना मार्गदर्शन करताना पोनि. अरुण पवार.

Web Title: Don't ruin people's world by selling alcohol