डिजिटल अन डीजेचा खर्च टाळून गरजू मुलांच्या फीसाठी शाळेला दिली 55 हजाराची देणगी

By रवींद्र देशमुख | Published: February 18, 2024 03:07 PM2024-02-18T15:07:00+5:302024-02-18T15:07:31+5:30

सोलापूर : शिवसेना(उबाठा) शहर उत्तरच्या वतीने शिवजयंती साधेपणाने साजरी करून वाचवलेल्या पैशातून सरस्वती मंदिर शाळेला गरजू विद्यार्थ्यांच्या फी साठी ...

Donation of 55 thousand was given to the school for the fees of needy children by avoiding the cost of digital and DJ | डिजिटल अन डीजेचा खर्च टाळून गरजू मुलांच्या फीसाठी शाळेला दिली 55 हजाराची देणगी

डिजिटल अन डीजेचा खर्च टाळून गरजू मुलांच्या फीसाठी शाळेला दिली 55 हजाराची देणगी

सोलापूर: शिवसेना(उबाठा) शहर उत्तरच्या वतीने शिवजयंती साधेपणाने साजरी करून वाचवलेल्या पैशातून सरस्वती मंदिर शाळेला गरजू विद्यार्थ्यांच्या फी साठी 55 हजार रुपयांची देणगी दिली.

डीजे अन डिजिटलच्या जमान्यात डॉल्बी पासून होणारा त्रास लक्षात घेता व गोरगरीब विद्यार्थ्यांची फी मुळे होणारे ओढतान लक्षात घेऊन शिवसेना शहर उत्तरच्या वतीने शिवजन्मोत्सव साध्या पद्धतीने परंतु तितक्याच उत्साहात साजरा करत अनावश्यक खर्चाला फाटा देऊन पंचावन्न हजार रुपये वाचवले या पैशातून अनेक विद्यार्थ्यांना मदत होणार असून त्यामुळे त्यांच्या पालकांचे ओझे कमी होणार आहे यासाठी महेश धाराशिवकर यांनी पुढाकार घेत मित्रांना याबाबत आवाहन केल्या असता अगदी अमेरिकेतून देखील यासाठी मदत मिळाली.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण शहर उपप्रमुख संदीप बेळमकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते दिलेल्या देणगी बद्दल संस्थेचे सचिवा सौ.प्रीती चिलजवार, खजिनदार सुधीर देव, संचालक मोहनराव दाते, किरण करकमकर, ऍड.पी. एल.देशमुख मुख्याध्यापिका  यरमाळकर आदी पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी रामचंद्र अनवेकर, सोमशंकर कंठीमठ, संताजी माने, महेश कुलकर्णी, चंद्रशेखर कळसकर, पिंटू कानेगावकर, राहुल वांगी, आनंद गोयल उपस्थित होते.

Web Title: Donation of 55 thousand was given to the school for the fees of needy children by avoiding the cost of digital and DJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.