अन्नछत्र मंडळाकडून राम मंदिर निर्मितीसाठी देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:43 IST2021-02-05T06:43:57+5:302021-02-05T06:43:57+5:30

चपळगाव : अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून ५१ हजार रुपये, तर विजय ...

Donation for construction of Ram Mandir from Annachhatra Mandal | अन्नछत्र मंडळाकडून राम मंदिर निर्मितीसाठी देणगी

अन्नछत्र मंडळाकडून राम मंदिर निर्मितीसाठी देणगी

चपळगाव : अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून ५१ हजार रुपये, तर विजय उर्फ अमोलराजे भोसले यांच्याकडून वैयक्तीक ११ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने राष्ट्रीय कार्यात नेहमीच योगदान दिले आहे. न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली न्यासाकडून श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी ५१ हजार रुपये व वैयक्तीक ११ हजार रुपयांचा निधी तीर्थक्षेत्रचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांना प्रदान करण्याकरिता सोलापूरचे प्रांत सद्भावना मंडळ सदस्य रंगनाथ बंकापुरे यांच्याकडे तो वितरीत करण्यात आला. प्रारंभी त्यांच्या हस्ते बंकापुरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुका राम मंदिर निधी संयोजक तम्मामामा शेळके, चेतन जाधव, विश्व हिंदू परिषदेचे स्वामीनाथ बेंद्रे, धर्म जागरण जिल्हा सहसंयोजक प्रसाद हारकुड, सागर चव्हाण, प्रवीण राऊत व मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, एस. के. स्वामी, सतीश महिंद्रकर, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, प्रवीण घाडगे, दत्ता माने उपस्थित होते.

----

फोटो : २८ अन्नछत्र

अन्नछत्र मंडळाच्या वतीने राम मंदिर निर्माणसाठी देणगी देण्यात आली. याचा धनादेश रंगनाथ बंकापुरे यांच्याकडे सुपूर्द करताना अमोलराजे भोसले

Web Title: Donation for construction of Ram Mandir from Annachhatra Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.