त्या डाॅक्टरवर यापूर्वीही गुन्हे दाखल मात्र, जामीन मिळतो पुन्हा दवाखाना सुरु होतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST2021-09-02T04:47:59+5:302021-09-02T04:47:59+5:30
कुर्डूवाडी : झेडपीच्या आरोग्य विभागाने नागरिकांच्या तक्रारीवरून आदेश दिल्यानंतर माढ्याच्या टीएचओने तालुक्यातील रोपळे (क) येथील रुग्णांच्या आरोग्याशी खेळत वैद्यकीय ...

त्या डाॅक्टरवर यापूर्वीही गुन्हे दाखल मात्र, जामीन मिळतो पुन्हा दवाखाना सुरु होतो
कुर्डूवाडी : झेडपीच्या आरोग्य विभागाने नागरिकांच्या तक्रारीवरून आदेश दिल्यानंतर माढ्याच्या टीएचओने तालुक्यातील रोपळे (क) येथील रुग्णांच्या आरोग्याशी खेळत वैद्यकीय सेवा बजाविणाऱ्या कैलास शंकर पळसाळगे (मूळ गाव किल्लारी,जि लातूर) याच्याविरुद्ध कुर्डूवाडी पोलिसांत गुन्हा नोंदला. त्यात त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आला आहे. या प्रकरणामुळे मात्र तालुक्यातील इतर गावातील बोगस डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे. काहींनी आपापले दवाखाने तात्पुरते का होईना बंद ठेवलेले आहेत.
रोपळ्याच्या संबंधित बोगस डॉक्टरवर गेल्या वीस वर्षांत रोपळे गावातीलच अनेकांच्या तक्रारीवरून तीनवेळा बोगस डॉक्टर म्हणून पोलिसांत गुन्हा नोंद असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. पण, यात जामीन मिळाला की तो बोगस डॉक्टर पुन्हा गावात येऊन आपला दवाखाना नव्याने सुरू करीत असल्याचा आरोप सरपंच वैशाली गोडगे यांनी केला. तो बोगस वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्त परिसरातील काही भक्तांना दर रविवारी दवाखान्यात बोलावून एका संतांच्या प्रतिमेची पूजा करीत त्यांच्या नावावरून बुवाबाजीही करीत असल्याचे सरपंच गोडगे यांच्याकडून सांगण्यात आले.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात यांनी कैलास शंकर परसाळगे याच्याविरूद्ध तक्रार देताच पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतले होते. त्याच्यावर ॲलोपॅथी उपचार पद्धतीचा परवाना नसताना अनेक रूग्णांवर उपचार करून जीवाशी खेळत असल्याबद्दल गुन्हा दाखल आहे.
----
पुन्हा गावात येणार का, मूळ गावाकडे जाणार?
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात,अंकुश कुंभार, संतोष पोतदार व डाॅ. बालाजी भोसले यांच्या पथकाने ३० ऑगस्ट रोजी दुपारी रोपळे (क) येथील या बोगस चालणाऱ्या दवाखान्याला अचानकपणे भेट दिली होती. त्यावेळी तपासणी केली असता कैलास शंकर परसाळगे हा बोगस असल्याचे समोर आले होते. यामुळे मात्र हा बोगस डॉक्टर पुन्हा गावात येणार की, आपल्या मूळ गावाला जाणार याची चर्चा रोपळे गावातून सुरू आहे.
-----
फोटो ओळ -
रोपळे (क) येथील तो डॉक्टर या इमारतीतून आपला दवाखाना चालवितो.
010921\20210901_133320.jpg
रोपळे बोगस डॉक्टर इमारत फोटो