दोन आमदार कधी भांडतात का?, मग तुम्ही का? भांडत बसता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:57+5:302021-02-05T06:46:57+5:30

माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील पाथरी (उत्तर सोलापूर) ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. नूतन सदस्यांचा सत्कार देशमुख यांनी ...

Do two MLAs ever quarrel? Then why you? Arguing | दोन आमदार कधी भांडतात का?, मग तुम्ही का? भांडत बसता?

दोन आमदार कधी भांडतात का?, मग तुम्ही का? भांडत बसता?

माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील पाथरी (उत्तर सोलापूर) ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. नूतन सदस्यांचा सत्कार देशमुख यांनी गावात येऊन केला. गावातील व गावाच्या संबंधित १०० प्रश्नांचे निवेदन यावेळी श्रीमंत बंडगर यांनी दिले. गावकऱ्यांच्या लोकसहभागातून बरेच प्रश्न मार्गी लावू, असे बंडगर यांनी सांगितले. शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करावी, त्याला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आ. देशमुख यावेळी म्हणाले.

यावेळी नूतन सदस्य श्रीमंत बंडगर, आनंद बंडगर, उमेश पाटील, पंकज मसलखांब, सुनीता वाघमोडे, सोनाली गायकवाड, राजश्री माने, सुवर्णा वाघमोडे, लक्ष्मी मळगे, तिर्हेचे सदस्य विशाल जाधव, महेश पवार, नारायण गायकवाड, समाधान गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष काशीनाथ कदम, प्रभाकर माने, औदुंबर बंडगर, म्हाळप्पा बंडगर, चंद्रकांत मसलखांब, महादेव जाधव आदी उपस्थित होते.

फोटो-०२पाथरी

पाथरी ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सदस्यांच्या सत्कारप्रसंगी रोप लागवड करताना आ. सुभाष देशमुख, श्रीमंत बंडगर आदी.

---

Web Title: Do two MLAs ever quarrel? Then why you? Arguing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.