शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
4
अमेरिकेने केली इराणची कोंडी, इराणला चारही बाजूंनी अमेरिकेने घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ
5
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
7
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
8
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
9
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
10
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
11
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
12
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
13
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
14
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
15
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
16
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
17
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
18
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
19
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
20
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

व्हीव्हीपॅट बंद पडली तर चिंता नाही;  पंधरा मिनिटात मतदान केंद्रात पर्यायी व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:03 IST

माढा लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाची सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. 

ठळक मुद्देमाढा मतदारसंघात तब्बल १९ लाख ४ हजार ८८५  मतदार माढा लोकसभा मतदारसंघाकरिता एकूण २ हजार २५ मतदान केंद्रेकायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी ४३ केंद्रे संवेदनशील ठरवली

संतोष आचलारे

माढा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी संपत आहे. मतदानाच्या तयारीसंदर्भात प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. माढा मतदारसंघात तब्बल १९ लाख ४ हजार ८८५  मतदार आहेत. मतदान कशा पद्धतीने होणार, यासाठी नेमके काय करण्यात आले आहे याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांची ही बोलकी उत्तरे !

प्रश्न : मशिन्स बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत काय उपाययोजना असेलउत्तर : माढा लोकसभा मतदारसंघाकरिता एकूण २ हजार २५ मतदान केंद्रे आहेत. यासाठी पुरेसे ईव्हीएम, बॅलेट व कंट्रोल युनिट उपलब्ध आहेत. मशीन बंद पडली तर तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडे पर्यायी मशीन ठेवण्यात आल्या आहेत. अशा घटना घडल्या तर पंधरा मिनिटात पर्यायी व्यवस्था होणार आहे. त्यामुळे मतदानावर व्यत्यय येणार नाही.

प्रश्न : संवेदनशील मतदान केंद्र किती व त्यावर कसे नियोजन असेल?उत्तर : कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी ४३ केंद्रे संवेदनशील ठरवली आहेत. तर निवडणुकीच्या दृष्टीने २0 क्रिटिकल केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रावर पोलिसांचा विशेष बंदोबस्त देण्यात आला आहे. शिवाय मतदानाचे लाईव्ह चित्रीकरण होणार आहे.

प्रश्न : अतिरिक्त मतदान मशिन्सची काय व्यवस्था करण्यात आली आहे? उत्तर : माढा लोकसभा मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रात दोन बॅलेट युनिट तर प्रत्येकी एक कंट्रोल व व्हीव्हीपॅटची गरज असल्याने त्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली  आहे. याशिवाय ४९२ कंट्रोल युनिट, ८२८ बॅलेट युनिट व ५११ व्हीव्हीपॅट मशिन्स राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी या मशिन्सची गरज असेल त्या ठिकाणी तातडीने पुरविण्यासाठी विशेष नियंत्रण रुम निर्माण करण्यात आले आहे. 

दिव्यांग मतदारांसाठी ७३0 व्हिलचेअरदिव्यांग मतदारांचा मतदानात सहभाग वाढविण्यासाठी विशेष सुविधा देण्यात येत आहेत. त्यांना मतदानासाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दिव्यांगांसाठी १११0 व्हिलचेअरची गरज आहे. यापैकी ७३0 उपलब्ध झाले आहेत. उर्वरित खुर्च्याही सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उपलब्ध करून घेण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

महिलांचे एक केंद्र तैनातया लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रात मतदान अधिकारी पासून ते शिपाई पर्यंत फक्त महिला असतील. मतदान घेण्यासाठी सहा महिला केंदे्र ही निश्चित करण्यात आली आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाढाElectionनिवडणूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय