शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांकडून कोणत्याच प्रकारची सक्तीची वसुली करू नका : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 12:23 IST

६० हजार मजुरांना देणार काम : जिल्हाधिकारी

ठळक मुद्देदुष्काळी मदतीसाठी शेतकºयांच्या याद्या तयारशासनाकडून मदत प्राप्त झाल्यानंतर त्यात दिरंगाई होणार नाहीदुष्काळासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी

सोलापूर : केंद्र शासनाच्या पथकाने दोन दिवस जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आहे. जिल्ह्यात दुष्काळात ६० हजार मजुरांना काम देण्याचे नियोजन केले. शेतकºयांकडून कोणत्याही प्रकारची सक्तीची वसुली करू नका, असे यंत्रणेला निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. ग्रामीण भागात तीन हजार रस्ते करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणी झाली आहे. शनिवारी आणि रविवारी पुन्हा दुष्काळाची पाहणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या पाच टँकर असून टँकर मंजुरीचे अधिकार प्रांत अधिकाºयांना दिले आहेत. नरेगाच्या कामावर येणाºया मजुरांची संख्या कमी आहे. पाणंद रस्ते १ ते २ किलोमीटरचे आहेत. ज्या गावाला आवश्यकता आहे. त्या ठिकाणी रस्ते करण्यात येणार असून सांगोल्यात त्या दृष्टीने पाहणी केल्याचे भोसले यांनी सांगितले. अतिक्रमण काढून रस्ते करण्यात येणार आहेत. त्यासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी आहे. कच्च्या रस्त्यावर मुरुम टाकून मजबुतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याला १५ लाख रुपयांचा निधी आलेला आहे. ज्या ठिकाणी बागा आहेत त्या ठिकाणी शेततळे, विहिरीच्या कामांना गती देण्यात आली. 

फळबागा जगविण्यासाठी शेतकºयांनी टँकरची मागणी केली आहे. केंद्रीय पथकाने त्याची दखल घेतली असल्याचे ते म्हणाले. जमीन महसूल, वाढीव जमीन महसूल वसुली केली जाणार आहे. कर्जाची वसुली कोणत्याही सक्तीच्या मार्गाने केली जणार नाही.  एफआरपीच्या पैशामधून वसुली केली जाणार नाही.  शेतकºयांना केंद्र आणि राज्य शासन मदत करणार आहे. आम्ही फक्त वस्तुनिष्ठ अहवाल पाठवला आहे. त्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय होईल.

शेतकºयांच्या याद्या तयारदुष्काळी मदतीसाठी शेतकºयांच्या याद्या तयार केल्या आहेत. शासनाकडून मदत प्राप्त झाल्यानंतर त्यात दिरंगाई होणार नाही. ती रक्कम तत्काळ शेतकºयांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. दुष्काळासाठी प्रशासन सज्ज असल्याचे ते म्हणाले. गाळपेर जमिनीवर चारा लागवड करण्यासाठी शेतकºयांना बियाणे, खत वाटप करण्यात आहेत. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ असल्याने सुट्टीच्या दिवशी शासकीय कार्यालये सुरु राहणार आहेत. लवकरच सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नागरिकांना ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. यासाठी तालुकानिहाय दोन वाहने आणि पाच कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय